मुंबई, ता. 29 : राज्यात 21 मे नंतर एकही नवीन कोरोनाचा रुग्ण आढळणार नसल्याचा दावा मुंबई विद्यापीठाच्या स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक स्कुल (अर्थशास्त्र विभाग) ने केला आहे. विभागाने देशभरातील विविध राज्यातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीच्या अभ्यास करून अहवाल तयार केला आहे.
देशभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील कोरोना बधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. यामुळे 3 मे पर्यंत लागू केलेला लॉकडाऊन पुन्हा वाढवण्याच्या शक्यता व्यक्त होत आहेत. या परिस्थितीत मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाने डॉ नीरज हातेकर यांच्या नेतृत्वाखाली कोरोना बाबत एक अहवाल तयार केला आहे. या अहवालासाठी देश विदेशातील कोरोना प्रभावित भागांचा अभ्यास करण्यात आला आहे. या अहवालामध्ये विविध गोष्टींचा समावेश केला आहे.
कोरोना आजार सुरुवातीला हळू पसरतो. त्यानंतर नागरिकांना कोरोनाची वेगाने लागण होते आणि त्यानंतर त्याचा प्रभाव कमी होत जातो. त्याचप्रमाणे एक असा दिवस येतो की कोरोनाचा प्रभाव शून्य होतो. हे निष्कर्ष देशातील विविध राज्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारीचा अभ्यास करून काढण्यात आला आहे. केरळ, हिमाचल प्रदेश, ओडिशा आणि उत्तरांचल राज्यात आज कोरोना रुग्णाचे नवीन प्रकरणाची नोंद नसल्याचे कळाले आहे. याचाच अर्थ असा की कोरोनाचा प्रभाव हळू, वेगात, जोरात, पुन्हा हळू आणि नंतर शून्यवर येतो. अशा पद्धतीने हा आजार पसरतो आणि संपत असल्याचे या अहवालामुळे कळाले आहे.
महाराष्ट्रात पहिले एका रुग्णापासून कोरोनाचे सत्र चालू झाले. आता तो वेगाने वाढत आहे. ज्याप्रमाणे इतर राज्यात कोरोनाने पाय पसरले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात वाढत आहे. आता कोरोना राज्यात वेगाने वाढत असून त्यानंतर त्याचा प्रभाव कमी होईल आणि 21 मे नंतर महाराष्ट्रमध्ये एकही नवीन रुग्ण नसणार असल्याचे या अहवालात म्हंटले आहे.
तर पुन्हा कोरोना वेगाने वाढेल
देशातील नागरिकांनी लॉकडाऊनचे खूप चांगल्या प्रकारे पालन केले. त्यामुळेच कोरोना आजारावर मात करण्यासाठी सरकारला यश आले. जर याचप्रमाणे संचार बंदी आणि नागरिकांमध्ये संयम असेल तर कोरोना पूर्णपणे हरेल. जर सरकारने रेल्वे चालू केली तर कोरोना पुन्हा वेगाने आपले पाय पसरेल.
there wont be new patient in mumbai after 21st may check who made this report
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.