मुंबई: मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. १८९६ साली प्लेग आजार संपूर्ण मुंबईत पसरला होता. तर आता २०२० मध्ये आर्थिक राजधानी मुंबई कोरोना व्हायरसच्या या भयंकर जागतिक महामारीचा सामना करत आहे. मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत चालली आहे.
मुंबईत पसरलेल्या प्लेगच्या महामारीच्या तुलनेत कोरोनानं मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या फारच कमी आहे. मात्र तरीही रुग्णांची संख्या वाढणं ही मुंबईसाठी चिंताजनक बाब आहे. लस उपलब्ध नसल्यामुळे आजही डॉक्टरांना कोरोना रुग्णांवर सामान्य फ्लूच्या रुग्णाप्रमाणेच उपचार करावे लागत आहेत.
असं म्हणतात कितीही मोठं संकट आलं तरी मुंबई कधीही थांबत नाही. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम शिथिल करताच अनेक लोकं कामावर जाण्यासाठी आपल्या घराबाहेर पडले. मात्र बस आणि ट्रेनमध्ये पूर्वीप्रमाणेच लोकांची गर्दी दिसून आली. लोकांनी आपल्या जीवनात खरंच काही बदल केले आहेत का? आणि मुंबईकरांवर या कोरोनाचा काय परिणाम झाला हे आपण आज जाणून घेणार आहोत.
लोकल सेवा झाली ठप्प:
मुंबईची लाईफलाईन म्हणजे मुंबईची लोकल. मुंबईवर कितीही मोठं संकट आलं तरीही मुंबईची लोकल कधीही बंद पडत नाही. या आधी १९७४ ला मजुरांच्या उपोषणाच्या काळात २० दिवस तर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी २४ तासांसाठी लोकल सेवा बंद करण्यात आली होती. मात्र त्यांनतर कधीही लोकल बंद झाली नाही. पावसात मुंबईत पाणी तुंबलं असतानाही मुंबईची परिवहन सेवा कधीही बंद झाली नाही. मात्र या कोरोना महामारीमुळे गेल्या २ महिन्यांपासून लोकल सेवा ठप्प आहे.
"लोकल ही मुंबईची रक्तवाहिनी आहे. तब्बल ८० लाख लोकांना एका जागेवरून दुसऱ्या जागी पोहोचवण्याचं काम लोकल करते. मात्र लोकलमध्ये सुरक्षित अंतर ठेऊन प्रवास करणं अशक्य आहे. कोरोनाचा धोका टळल्यानंतरच लोकल सेवा सुरु करण्यात येईल. अधिकारी प्रवाशांच्या आरोग्याबाबत कोणतीही जोखीम घेऊ शकत नाहीत" असं पश्चिम रेल्वे कर्मचारी संघाचे महासचिव जी. आर. भोसले यांनी म्हंटलंय.
बँकिंग क्षेत्रावर परिणाम :
लॉकडाउनच्या काळात बँकेचे व्यवहार सुरु ठेवण्यास सरकारनं परवानगी दिली होती. मात्र बँकेचं कामकाज कोणत्या पद्धतीनं हवं याबाबत सरकारकडून नियमावली देण्यात आली होती. बँकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवेचं पत्र देण्यात आलं होतं. हे पत्र पोलिसांना दाखवूनच त्यांना प्रवासाची परवानगी मिळत होती. तसंच बँकेत वेळोवेळी सॅनेटाईझरचा वापर करणं त्याचबरोबर बँकेत किती रोख रक्कम ठेवता येइल या संबंधीची नियमावली रिझर्व्ह बँकेनं इतर बँकांना दिली होती.
मुंबईच्या डबेवाल्यांची वाढली चिंता:
लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका मुंबईच्या डबेवाल्यांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे ऑफिसेस बंद आहेत. त्यामुळे तब्बल ३० लाखांपेक्षा जास्त लोकांची भूक भागवणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ आली. मुंबईचे सुमारे ५००० डबेवाले लॉकडाऊनमुळे आपल्या मूळ गावी गेले. पाऊस असो ऊन असो किंवा कुठलाही संकट असो मुंबईचे डबेवाले आपल्या कर्तव्याला मुकले नाहीत. मात्र आता जिवाच्या भीतीनं त्यांना आपलं काम सोडून आपल्या मूळ गावी जाण्याची वेळ आली आहे.
घरकाम करणाऱ्यांवर आर्थिक संकट:
लॉकडाऊनमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट आलं आहे. धुणी-भांडी करून आपलं घर चालवणाऱ्या महिलांना आता काम अनासल्यामुळे त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. काही महिलांना तर कामाचे पैसेसुद्धा मिळू शकले नाहीये. त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतरही लोक घरकाम करणाऱ्या कामावर ठेऊन घेणार नाहीत अशी भीती या घरकाम करणाऱ्या महिलांच्या मनात आहे.
these area are mostly affected in mumbai due to lockdown
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.