डोंबिवली - डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रोडवरील साईबाबा चौकात स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन आहे. शनिवारी रात्री एका चोरट्याने ही मशीन कटरच्या सहाय्याने फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. चोरीचा प्रयत्न फसल्याने चोरटा तेथून पळून गेला. यादरम्यान एटीएम मशीन मधील विद्युत यंत्रणा गरम झाल्याने मशीनसह त्यातील 21 लाख 11 हजाराची रोख रक्कम जळून खाक झाली आहे.
शनिवारी रात्री 1 ते 2 च्या सुमारास एका चोरट्याने स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडून त्यातील रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. मशीन फुटत नसल्याने त्याने गॅस कटरचा वापर करुन ते फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र या दरम्यान मशीन मधील विद्युत यंत्रणा गरम झाली व मशीनच्या आतील भागास आग लागली. हे पाहून चोरट्याने तेथून पळ काढला.
या आगीत मशीनमधील 21 लाखांची रोख रक्कम जळून खाक झाली. या घटनेची माहिती बॅंकेच्या नियंत्रण कक्षाला मिळताच तेथील कर्मचाऱ्यांनी एटीएमचे परिचालन करणाऱ्या इलेक्ट्रिक पेमेंट सर्व्हिसेस सिस्टिमला ह माहिती दिली. तेथील यांत्रिकी कर्मचाऱ्यांनी तातडीने डोंबिवलीत येऊन एटीएम मशीनची पाहणी केली.
परंतू तोपर्यंत एटीएम मशीनसह त्यातील रोख रक्कम जळाली होती. एटीएमचा मशीन परिचालन कर्मचारी राकेश पवार यांच्या तक्रारीवरुन विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरिक्षक जी.बी.देवरे याचा अधिक तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.