Mumbai: विसर्जन मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट; तब्बल इतके मोबाईल केले लंपास, लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत सर्वाधिक

Ganpati visarjan procession mobiles stolen: सगळ्यात जास्त चोऱ्या लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत झाल्याचं सांगण्यात आलं आहे. गर्दीचा फायदा घेत चोरांनी भक्तांच्या मोबाईलवर डल्ला मारला आहे.
Ganpati visarjan
Ganpati visarjan
Updated on

Thieves in ganpati visarjan

मुंबईकरांनी गणपतीचे विसर्जन थाटामाटात केले. लोकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. लाखोंच्या संख्येने गणेशभक्त लाडक्या बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी जमले होते. मात्र, याच वेळी विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. आत्तापर्यंत २६७ भाविकांनी मोबाईल फोन गहाळ झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

२२ भक्तांचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सगळ्यात जास्त चोऱ्या लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत झाल्याचं सांगण्यात आलं आहे. गर्दीचा फायदा घेत चोरांनी भक्तांच्या मोबाईलवर डल्ला मारला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.