लॉकडाऊनमध्ये तृतीयपंथीयांची होतेय उपासमार! माय बाप सरकार देईल का लक्ष?

लॉकडाऊनमध्ये तृतीयपंथीयांची होतेय उपासमार! माय बाप सरकार देईल का लक्ष?
Updated on

वाशी : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा फटका सर्वच घटकांना बसला असून हातावर पोट असलेला, पण सर्वापासून दुर्लक्षित अशा तृतीयपंथीयांवरही उपासमारीचे संकट ओढवली आहे. सिग्नल, दुकाने, घरोघरी पैसे वसूल करून दैनंदिन जीवन जगणारे तृतीयपंथी अस्वस्थ झाले आहेत.

नवी मुंबईतील वाशीजवळील कोपरी गावात तृतीयपंथी राहतात. नवी मुंबईतील कोपरी गावात अनेक तृतीयपंथीयांनी आपल्या जमविलेल्या पैशाने सुमारे अर्धा एकर जमीन विकत घेतली आणि आता त्या ठिकाणी टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. त्यामुळे एकत्रित आलेल्या काही तृतीयपंथीयांना या इमारतीतील घरे व दुकानांचे चांगले भाडे मिळत आहे. त्यांचा या संचारबंदीच्या काळात त्यांच्या उदहनिर्वाहाचा तसा गंभीर प्रश्न राहिलेला नाही, मात्र  नवी मुंबई शहरांतील मुख्य सिग्नल, एपीएमसीसारख्या मोठ्या बाजारपेठा, दुकाने, व्यवसाय या ठिकाणी हक्काने पैसे वसूल करणाऱ्या तृतीयपंथीयांची गेली काही दिवस चांगलीच पंचाईत झाली आहे. टाळेबंदीत घरी राहावे लागल्याने हातावर पोट असणाऱ्या या घटकाची उपासमार सुरू झाली आहे. अन्नधान्य, तयार जेवण, अथवा प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे साहित्य वाटप करण्यासाठी या घटकाकडे मात्र कोणी फारसे लक्ष देत नसल्याचे दिसत आहे.

 
समाजात आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन दुर्लक्षित आहे. त्यात संचारबंदीमुळे आम्ही बाहेर पडू शकत नाही. दिवसभर कमवायचे आणि त्यावर उदरनिर्वाह करायचा असा आमचा दिनक्रम बंद झाला आहे. आमच्यातील अनेक गरीब तृतीयपंथीयांची उपासमार सुरू झाली आहे.
पिंकी अम्मा (तृतीयपंथी), वाशी

 

third gender community affected by lockdown in mumbai 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.