Thane News: सत्ताधारी पक्षाच्या नेत्याकडे पार्सल आलं, उघडताच बसला धक्का, थेट पोलीस स्टेशन गाठलं, काय घडलं?

Thane News: ठाण्यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्याला धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. पार्सलमधून काडतूस आणि पत्र पाठवत ही धमकी देण्यात आली आहे. या घटनेची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
parcel
parcelESakal
Updated on

ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे सत्ताधारी राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्याकडे एक पार्सल आले. पार्सल उघडताच त्यांना मोठा धक्का बसला आहे. पार्सलमध्ये काडतुसांसह धमकीचे पत्र होते. हे पार्सल वागळे इस्टेट येथील नेत्याच्या जनसंपर्क कार्यालयात पाठवले होते. पार्सलमध्ये काडतूस आणि धमकीची चिठ्ठी सापडल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार, नेत्याने पार्सल उघडले असता त्यात पेन्सिल शार्पनरचा बॉक्स होता. बॉक्सच्या आत कापडाच्या दोन तुकड्यांमध्ये गुंडाळलेली काडतूस होती. यासोबतच हिंदीत लिहिलेली धमकीची चिठ्ठीही सापडली असून, त्यात लिहिले होते की, यावेळी मी गोळी तुमच्या हातात ठेवतो. पुढच्या वेळी ती तुमच्या डोक्यात असेल. ही फक्त एक छोटी भेट आहे, पुढच्या वेळी ती मोठी असेल.

parcel
Stamp Duty: सरकारी तिजोरीत खडखडाट! आता स्टॅम्प ड्युटीसाठी मोजावे लागणार 500 रुपये, सरकारचा मोठा निर्णय

या घटनेनंतर नेत्याने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. पार्सल पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस संभाव्य संशयितांचा शोध घेण्यात व्यस्त आहेत.

अशा घटना सुरक्षा व्यवस्थेसमोरील आव्हान असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. स्थानिक नेत्याला मिळालेल्या धमकीनंतर पोलीस सुरक्षा पुरवण्याचा विचार करत आहेत. पार्सल पाठवणाऱ्याची ओळख पटवण्यासाठी पोलीस जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर क्लू तपासत आहेत. स्थानिक नेत्याला मिळालेल्या या धमकीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लवकरच या प्रकरणाचा तळ गाठून आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.