थर्टीफर्स्टला पिणाऱ्यांना पोलिसांनी केले असे 'काही'!

थर्टीफर्स्टला पिणाऱ्यांना पोलिसांनी केले असे 'काही'!
थर्टीफर्स्टला पिणाऱ्यांना पोलिसांनी केले असे 'काही'!
Updated on

नवी मुंबई : थर्टीफर्स्टच्या मध्यरात्री नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत नेरूळमधील अपघात वगळता कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. मात्र, नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या तब्बल 385 तळीरामांना अटक केली. मागील वर्षी थर्टीफर्स्टच्या रात्री 353 तळीराम पोलिसांच्या हाती लागले होते. याशिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 1697 वाहन चालकांवरदेखील वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. 

थर्टीफर्स्टच्या मध्यरात्री नववर्षाचे स्वागत करताना अनेक जण पार्ट्या झाल्यानंतर दारूच्या नशेत आपली वाहनाने घरी जातात. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता असल्याने मागील काही वर्षांपासून अशा तळीरामांवर थर्टीफर्स्टच्या मध्यरात्री ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह मोहिमेदरम्यान कारवाई करण्यात येत आहे. यावेळच्या कारवाईत विभागवार 340, तर उर्वरित 45 कारवाया या विविध पोलिस ठाण्यांनी केल्या. थर्टीफर्स्टच्या ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह मोहिमेदरम्यान पकडलेल्या वाहनचालकांचे ड्रायव्हींग लायसन्स तीन ते सहा महिन्यांसाठी निलंबित होण्याची शक्‍यता आहे. तसेच थर्टीफर्स्ट साजरा करताना कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून नवी मुंबई पोलिसांनी परिमंडळ स्तरावर-44 तर वाहतुक विभागाकडून 18 ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यासाठी वाहतूक शाखेकडून 300 पोलिस अधिकारी, कर्मचारी व अतिरिक्त पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. 

गत वर्षाच्या तुलनेत वाढ 
गत वर्षी थर्टीफर्स्टच्या रात्री वाहतूक पोलिसांनी 353 तळीरामांना ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह मोहिमेदरम्यान अटक केली होती. मात्र गत वर्षाच्या तुलनेत या वर्षी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांच्या संख्येत 32 ने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 

विभागवार कारवाई 
वाशी 30 
एपीएमसी 38 
कोपरखैरणे 38 
रबाळे 14 
महापे 16 
तुर्भे 23 
सिवूड्‌स 8 
सीबीडी बेलापूर 19 
खारघर 25 
तळोजा 28 
कळंबोली 41 
पनवेल 21 
पनवेल तालुका 17 
उरण 7 
न्हावा-शेवा 5 
गव्हाणफाटा 10 
एकूण - 340 

या वर्षी थर्टीफर्स्टच्या निमित्ताने संपूर्ण आयुक्तालयाच्या हद्दीत कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या वेळी "ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह'च्या विशेष मोहिमेत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या 385 वाहनचालकांना पडकण्यात आले. या कारवाईत पकडण्यात आलेल्या वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स तीन ते सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव आरटीओ विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. 
- अरुण पाटील, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग, नवी मुंबई. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.