धारावीत जमावाने जोरदार विरोध करत गोंधळ घातल्याची घटना समोर आली होती. बीएमसीच्या वाहनाच्या काचाही फोडल्या. याप्रकरणी आता धारावी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या तिघांवरही दंगल भडकवल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कलम १३२, १८९ (१,२), १९०, १८४(४), १९१(२), ३२४(३), १९१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये कलम १३२ अजामीनपात्र आहे. सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याबद्दल कलम १३२ लागू आहे. सध्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
या घटनेनंतर धारावी पोलीस स्टेशनपर्यंत सुमारे ५ हजार लोकांचा जमाव जमल्याचे समोर आले होते. या गर्दीत अनेक बाहेरचे लोकही होते. पोलीस धारावी बाहेरून आलेल्या लोकांची ओळख पटवत होते. बीएमसीच्या विध्वंसाच्या कारवाईच्या विरोधात जमाव जमवण्यासाठी भडकाऊ पोस्ट आणि व्हिडिओ बनवण्यात आल्याचंही तपासात समोर आलं आहे.
या पोस्ट आणि व्हिडिओ शुक्रवारी रात्रीपासून व्हायरल होऊ लागले. बीएमसीच्या कारवाईच्या दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी धारावीतील मशीद परिसरात मोठी गर्दी जमली होती, त्यामुळे वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. आंदोलक रस्त्यावर बसले. यानंतर पोलिसांचे पथक आले आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
वाहने जाऊ शकतील यासाठी त्यांना बाजूला करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांची समजूत काढण्यासाठी स्थानिक लोकही पुढे आले. याप्रकरणी बीएमसीने बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी मशीद समितीला आठ दिवसांची मुदत दिली आहे. तोपर्यंत बीएमसी मशिदीवर कोणतीही कारवाई करणार नाही. दरम्यान या मशिदीवर कोणतीही कारवाई होऊ नये, यासाठी मुस्लीम समुदाय न्यायालयात धाव घेणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.