मातोश्रीच्या दारावर पुन्हा कोरोनाची ठकठक, आणखी तीन पोलिस कोरोना पॉझिटिव्ह

मातोश्रीच्या दारावर पुन्हा कोरोनाची ठकठक, आणखी तीन पोलिस कोरोना पॉझिटिव्ह
Updated on

मुंबई - मुंबईत कोरोनाचा कहर वाढतोय. एकट्या मुंबईत कोरोना रुग्णाची संख्या अकरा हजारांच्यावर आहे. नवीन रुग्णांमध्ये पोलिस त्याचसोबत आरोग्य कर्मचारी देखील सापडत असल्याने चिंता वाढतेय. अशात एक चिंताजनक बाब पुन्हा एकदा समोर आलेली पाहायला मिळतेय. याला कारण आहे मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानाबाहेरील म्हणजेच मातोश्री बाहेरील पोलिसांना कोरोना झाल्याचं समोर आलंय.  

वांद्रे पूर्व येथील मुख्यमंत्र्यांचे खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेरील आणखी 3 पोलिस कॉन्स्टेबल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तिघांनाही सांताक्रूझमध्येच क्वारंटाइन करण्यात आले आहे. या पुर्वी ही मातोश्रीवर सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या 130 जणांच्या सिक्युरिटी स्टाफला क्वारंटाइन करण्यात आले होते. तर, काही दिवसांपूर्वी मातोश्री बाहेरील चहावालयाला ही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. 

दरम्यान, वांद्रे पूर्व आणि पश्चिम हे दोन वॉर्ड सध्या कोरोनाच्या विळख्यात आहेत. आतापर्यंत या विभागात बरेच कोरोना रुग्ण आढळले असुन एच पूर्व मधील अनेक छोटे मोठे परिसर हॉटस्पॉट झाले आहेत. 

एच पूर्व मधील हॉटस्पॉट परिसर - 

वांद्रे पूर्व, टिचर्स कॉलनी, गव्हर्नमेंट कॉलनी, भारत नगर, खेरवाडी, वांद्रे टर्मिनस, धारावी कॉलनी, सांताक्रुझ, युनिव्हर्सिटी कँपस, एच पूर्व मधील वाकोला, गोळीबार रोड आणि शांतीलाल कंपाऊंड हे तीन परिसर हॉटस्पॉट झाले असून सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण इथे सापडले आहेत. 

three cops working outside matoshree found corona positive read report

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.