जुहू चौपाटीवर ३ जण बुडाले

तीनही युवक चेंबूर आणि वाशी नाका या भागातील रहिवासी
Drowned
DrownedSakal
Updated on

मुंबई - मुंबईमध्ये १३ ते १८ जून हे सलग आठ दिवस समुद्राला मोठी भरती आहे. या भरती दरम्यान नागरिक आणि पर्यटकांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करून समुद्रात पोहायला गेलेले तीन युवक जुहू चौपाटीवर बुडाले आहे. हे तीनही युवक चेंबूर आणि वाशी नाका या भागातील रहिवासी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मुंबई अग्निशमन दल आणि कोस्ट गार्डकडून व्यापक शोध मोहीम हातात घेतली.

शोध मोहीम सुरु

जुहू चौपाटी येथील जे डब्लू मेरियट हॉटेल जवळील समुद्रात संध्याकाळी 4 वाजताच्या दरम्यान तीन युवक बुडाले. मनोहर शेट्टी या लाईफ गार्डकडून माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाकडून शोध मोहीम हाती घेण्यात आली .बुडालेल्या युवकांच्या शोध घेण्यासाठी नेव्हीच्या डायव्हर्सची मदत घेतली जात आहे. अमन सिंग २१ वर्षे, कौस्तुभ गुप्ता १८ वर्षे, प्रथम गुप्ता १६ वर्षे अशी या बुडालेल्या युवकांची नावे आहेत. अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.