मुंबई : नवीन कोरोना बाधित (corona new patients) रुग्णांची संख्या आणखी कमी झाली असून आज 356 पर्यंत खाली आली. मुंबईतील पॉझिटिव्हीटी दर 1.40 टक्क्यावरून 1.19 टक्क्या पर्यंत खाली आला. आज सापडलेल्या रुग्णांपैकी 313 (88 टक्के) रुग्ण लक्षणे विरहित आहेत. नवीन रुग्णांपैकी 40 रुग्णांना रुग्णालयात (Mumbai corona update) दाखल करण्यात आले. मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा 10,51,729 लाखांच्या पार झाला आहे. कोरोना रुग्णवाढीचा दर 0.09 टक्के पर्यंत आहे. तर रुग्ण दुपटीचा दर ही 760 दिवसांपर्यंत वाढला आहे. मुंबईत सक्रिय रुग्णांचा (corona active patients) आकडा 5,139 इतका आहे.
रुग्ण दगावण्याचे प्रमाण किंचित वाढले असले तरी मयत झालेल्या रुग्णांची संख्या 5 च्या आत नोंद झाली. एकूण रुग्णांचा आकडा 16,666 वर पोचला आहे. आज 29,863 चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत 1,55,79,281 चाचण्या करण्यात आल्या आहेत. सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या केवळ 01 आहे. आज 949 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून आतापर्यंत 10,27,093 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे होण्याचा दर 98 टक्क्यांवर पोचला आहे.
आज सापडलेल्या बाधित रुग्णांपैकी 10 रुग्णांना ऑक्सिजन बेड वर दाखल करण्यात आले असून आतापर्यंत 618 रुग्णांना ऑक्सिजन बेड वर उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 7,37,027 रुग्ण लक्षणे विरहित आहेत. एकूण उपलब्ध रुग्णशय्यांपैकी 3.8 टक्के रुग्णशय्या भरल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.