Bullet train project : बुलेट ट्रेन प्रकल्पात एका महिन्यात तीन नदी पुलाचे काम पूर्ण

Bullet Train
Bullet Train
Updated on

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील तीन महत्वाच्या आणि आव्हानात्मक पुलाचे बांधकाम नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने पूर्ण केले आहे. गेल्या एका महिन्यात तीन नदींवरील पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. गुजरात राज्यात गेल्या एका महिन्यात तीन नदी पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

Bullet Train
Dhule News : मुंबई- आग्रा महामार्गावरील अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

यातील पहिला पूल नवसारी जिल्ह्यातील पूर्णा बांधण्यात आला. या पुलाची लांबी ३६० मीटर इतकी असून हा पूल ९ पूर्ण स्पॅन बॉक्स गर्डरने बनलेला आहे. हा पूल बिलीमोरा आणि सुरत स्टेशन दरम्यान आहे. भरतीच्या वेळी दर १५दिवसांनी नदीच्या पाण्याची पातळीत ५ ते ६ मीटरने वाढ होत असल्याने पायाभरणीचे काम आव्हानात्मक होते.

दुसरा पूल नवसारी जिल्ह्यातील मिंधोला नदीवर बांधण्यात आला. या पुलाची लांबी २४० मीटर आहे. हा पूल बिलीमोरा आणि सुरत HSR स्टेशन दरम्यान आहे. तर तिसरा पूल नवसारी जिल्ह्यातील अंबिका नदीवर बांधण्यात आला. या पुलाची लांबी २०० मीटर आहे. हा पूल बिलीमोरा आणि सुरतस्टेशन दरम्यान आहे.

या बांधकामादरम्यान नदीच्या काठाचा तीव्र उतार, ढीग करताना भूमिगत खडकाचे थर, सतत पाण्याचा गळती, आणि सुमारे २६ मीटर उंचीच्या (पियर कॅप्ससह) उंचीसाठी नदीत काम करणे अशा आव्हानांचा सामना करावा लागला.

Bullet Train
Sushma Andhare: राज, उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं का? सुषमा अंधारेंनी स्पष्टच सांगितलं

आतापर्यंत, बुलेट ट्रेनसाठी चार नदी पुलांचे बांधकाम गेल्या सहा महिन्यांत पूर्ण झाले आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प मार्गात गुजरात आणि महाराष्ट्र मिळून एकूण २४ नदी पूल आहेत. त्यापैकी २० गुजरातमध्ये आणि चार महाराष्ट्रात आहेत. गुजरातमध्ये १.२ कि.मी. भारतातील सर्वात लांब नदीवरील पूल नर्मदा नदीवर बांधला जात आहे. तर महाराष्ट्रात २.२८ किमी सर्वात लांब पूल वैतरणा नदीवर बांधण्यात येणार आहे.

नद्यांवर पूल बांधणे अत्यंत आव्हानात्मक आहे आणि त्यासाठी काटेकोर नियोजन आवश्यक आहे. मिंधोळा आणि पूर्णा नद्यांवर पूल बांधताना अरबी समुद्रातून येणाऱ्या भरती-ओहोटीच्या प्रवाहाकडे विशेष लक्ष दिले जात होते. आमच्या अभियंत्यांनी अंबिका नदीवर सुमारे २६ मीटर उंचीवर पुलाचे बांधकाम पूर्ण केले.

- राजेंद्र प्रसाद,व्यवस्थापकीय संचालक, एनएचएसआरसीएल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.