VIDEO : 'नरेश शेठ को जानसे मार देंगे'! भाजप पदाधिकाऱ्याच्या कार्यालयावर गोळीबार, घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

गोळीबाराचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता.
Ulhasnagar Police
Ulhasnagar Policeesakal
Updated on
Summary

अटक शूटर हे कुठल्या गँगशी संबंधित आहे का? ते भाजप कार्यालयात कोणावर हल्ला करण्यासाठी आले होते. त्यांनी गोळीबार का केला? याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.

उल्हासनगर : उल्हासनगर (Ulhasnagar) शहरातील भाजपाचे पदाधिकारी आणि केबल व्यावसायिक नरेश रोहरा यांच्या कार्यालयावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. त्यावेळी प्रत्युत्तर देत अंगरक्षकांनी देखील शूटरच्या दिशेनं गोळीबार करत त्यांना पळवून लावलं होतं.

Ulhasnagar Police
मोठी बातमी! 50 वर्षांपासून धगधगत असलेला बेळगाव सीमाप्रश्‍न सुटणार? 'ग्रामविकास'नं मागवली सीमेलगतच्या गावांची माहिती

गोळीबाराचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात चार ते पाच शूटर विरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू केला असता, मुख्य शूटरला गुजरातच्या सूरत मधून (Gujarat Surat) तर दुसऱ्याला नाशिकच्या सिन्नरमधून आणि एकाला उल्हासनगरमधून बेड्या ठोकल्या आहेत.

दिलावर हरी चव्हाण (वय २२), मनोज महेश गुप्ता (वय १९), गणेश गंगाराम मेरूकर (वय २४ ) असे अटक केलेल्या शूटर्सची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प नंबर ५ च्या प्रभाराम मंदिर शेजारी भाजप पदाधिकारी नरेश रोहरा यांचं कार्यालय आहे. ९ जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास चार तरुण रोहरा यांच्या कार्यालयाजवळ आले.

Ulhasnagar Police
Sangli : इतिहासातील पहिलीच घटना! मिरजेत आंबेडकरांच्या नावाची पाडली कमान; पाटणकरांचा आंदोलनाचा इशारा

त्यापैकी एकाने जबरदस्तीने त्यांच्या कार्यालयात घुसून तुमच्या शेठला भेटायचे आहे, असे सांगितले असता अंगरक्षकांनी त्या तरुणाला बाहेर काढले. परंतु, त्या अनोळखी इसमांनी अंगरक्षाकांना धक्काबुक्की केली. त्यावेळेस अंगरक्षकांनी त्यापैकी एकाच्या कमरेस तपासले असता त्याचेकडे एक चॉपर मिळाला म्हणून, अंगरक्षकांनी त्याला पकडून पुन्हा कार्यालयाबाहेर नेत असताना तीन अनोळखी शूटर्संनी जवळ असलेल्या १ गावठी कट्टा व २ पिस्टल अंगरक्षाकांवर रोखून "नरेश शेठ को जानसे मार देंगे" अशी जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

त्यावेळी प्रत्युत्तर म्हणून अंगरक्षकांनी देखील शूटरच्या दिशेनं गोळीबार केल्याने चारही शूटर घटनास्थळावरुन पळून गेले. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात अनोळखी चार शूटर विरोधात भा.द.वी. कलम ४५२, ४४०, ५०६ (२), ३२३, ३४, शस्त्र अधिनियम ३, २७, महा. पो. कायदा कलम ३७ (१), १३५ प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.

Ulhasnagar Police
Satara Crime : रात्रीत असं काय घडलं? अख्खं कुटुंबच अंथरुणात मृत्युमुखी पडलं; साताऱ्यात हादरून सोडणारी घटना

तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस पथकानं समांतर तपास सुरु असतानाच दि. १० जुलै रोजी गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने यातील आरोपी असलेला एक विधीसंघर्षित बालक यास श्रीराम चौक, उल्हासनगर येथून ताब्यात घेवून त्याच्याकडे तपास करून इतर आरोपींबाबत माहिती प्राप्त करण्यात आली.

त्यानंतर आरोपीचे तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांकडून प्राप्त माहितीच्या अनुषंगाने हिललाईन पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी सपोनि पडवळ व पथक यांनी गुजरातमधील सूरत येथून आरोपी शूटर दिलावरला सापळा रचून अटक केली. सिन्नरमधून शूटर मनोज गुप्तालाही अटक करण्यात आली. तर तिसरा शूटर गणेश गंगाराम मेरूकरला २० जुलै रोजी उल्हासनगर शहरातून बेड्या ठोकल्या.

Ulhasnagar Police
Jain Muni Case : शरीराचे तुकडे करुन जैन मुनींची निर्घृण हत्या; 'ती' डायरी पोलिसांच्या लागली हाती

या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. एस. डेरे करीत असून आज अटक आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून यातील मुख्य शूटर दिलावर याच्याविरुध्द विविध १० पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असून तो पोलीस रेकॉडवरील गुन्हेगार असल्याची माहिती एसीपी सुरेश वराडे यांनी दिली आहे. दरम्यान, अटक शूटर हे कुठल्या गँगशी संबंधित आहे का? ते भाजप कार्यालयात कोणावर हल्ला करण्यासाठी आले होते. त्यांनी गोळीबार का केला? याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()