उल्हासनगर - इंग्रजांच्या काळात स्वातंत्र्यासाठी शहीद झालेले हेमू कालानी यांचा थरारक इतिहास असणाऱ्या हर हर हेमू चित्रपटाचे उल्हासनगरात आयोजन करणारे वंडारशेठ पाटील फाऊंडेशन हेमू कालानी यांच्या प्रेमात पडले आहेत.
1943 साली इंग्रज रेल्वेने मालगाडीत हत्यारे घेऊन जात होते. त्या रेल्वे मार्गाची पटरी 19 वर्षीय हेमू कालानी यांनी मित्रांसोबत तोडून टाकली होती. त्यामुळे इंग्रजांना हत्यारे नेता आली नव्हती. या प्रकरणी हेमू कालानी यांना अटक करण्यात आल्यावर इंग्रज पोलिसांनी त्यांना मित्रांची नावे विचारली. पण शेवटपर्यंत हेमू कालानी यांनी मित्रांची नावे सांगण्यास नकार दिल्याने इंग्रजांनी त्यांना 19 व्या वर्षी फाशीची शिक्षा दिली होती.