पहिल्यांदाच 14 तिकीट तपासनीस कर्मचाऱ्यांना डीआरएम अवॉर्ड

DRM award
DRM awardsakal media
Updated on

मुंबई : लोकलमधून अनधिकृतरित्या विना तिकिट प्रवास (ticketless commuters) करणाऱ्या प्रवाशांना पकडण्याचे काम तिकीट तपासणीसकडून (ticket checker) केले जाते. यातून रेल्वेला महसूल मिळतो. या कामासह समाजपयोगी कामे करण्यामध्ये तिकीट तपासणीसांचा खारीचा वाटा आहे. प्रवाशांचा अपघात (commuters safety) होण्यापासून वाचविणे, दान केलेल्या अवयवाचा लोकल प्रवासविना व्यत्यय होण्यासाठी तिकीट तपासनीसांची धडपड सुरू असते. त्यामुळेच पहिल्यांदाच मध्य रेल्वेच्या (central railway) 14 तिकीट तपासणीसाना डीआरएम अवॉर्ड (DRM award) 2021 ने गौरविण्यात आले आहे.

DRM award
मुंबईतील पहिले 'मेमरी क्लिनिक' केईएम रुग्णालयात सुरु

रेल्वेची प्रतिमा सुधारण्यासाठी केलेल्या अतुलनीय व उल्लेखनीय कामाची दखल मध्य रेल्वे प्रशासनाने दखल घेण्यासाठी नुकताच मध्य रेल्वेच्या 66 व्या रेल्वे सप्ताह निमित्त रेल्वे प्रशासनाने मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) अवॉर्ड प्रदान करण्यात आला. डीआरएम शलभ गोयल यांच्या हस्ते मुंबई विभागातील 14 तिकिट चेकिंग स्टाफचा 2020-2021 चा डीआरएम अवॉर्ड, रोख रक्कम व प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला.

यामध्ये सीएसएमटीमधील हेडटीआय संजय आंग्रे, सीटीआय एच.एम. मोंडकर, हेडटीआय गिरिष कदम, सीटीआय पी.पी. कोरी, कल्याणमधील सीटीआय जसपाल सिंग राठोड, सीटीआय आर.सी.एल सागर, दादर येथील हेडटीआय दीपक पाटील, सीएसएमटी येथील सीटीआय सुजित मेनन, सीएसएमटी येथील टिटीआय विशाल शिंदे, कुर्ला येथील एसआरटीसी नितीन झा, माटुंगा येथील सीटीआय अस्मिता मांजरेकर, नाहूर येथील सीटीआय बाला भूपथि, एलटीटी येथील हेडटीसी संगीता मंडल, शिवडी येथील हेडटीसी स्वप्नाली संखे या 14 जणांच्या टीमला डीआरएम अवॉर्ड मिळाला आहे. रेल्वे प्रशासनाचे मनःपूर्वक आभार व अवॉर्ड विजेते तिकिट चेकिंग स्टाफचे हार्दिक अभिनंदन, तिकिट चेकिंग परिवारातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.