Titwala Murder Case: पत्नीने पतीचा मृत्यू दारु पिल्याने झाल्याचा दिला जबाब. मात्र, पोस्टमार्टममधून भलतंच सत्य उघड

Titwala Case:पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घडली आहे. एका पत्नीने आधी पतीची हत्या केली आहे. त्यानंतर त्याच्या हत्येचा बनाव केला
Murder
Murderesakal
Updated on

Titwala Murder Case:पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घडली आहे. एका पत्नीने आधी पतीची हत्या केली आहे. त्यानंतर त्याच्या हत्येचा बनाव केला की याचा मृत्यू अतिप्रमाणात दारुचं सेवन केल्याने झाला. मात्र, शवविच्छेदन अहवालातून सर्व सत्यता बाहेर आली आणि पत्नीला ताब्यात घेतलं.

टिटवाळ्याजवळ बल्याणी परिसरात पत्नीने पतीची गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली. प्रवीण मोरे असे मयत इसमाचे नाव आहे. प्रणिती मोरे असे आरोपी महिलेचे नाव असून टिटवाळा पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्यात.

पती दारू पिऊन वारंवार भांडण करत असल्याच्या रागातून पतीची हत्या केल्याची कबुली प्रणिताने दिली आहे. धक्कादायक म्हणजे पतीची हत्या केल्यानंतर दारू मुळे त्याचा मृत्यू झाल्याचा बनव प्रणितीने केला होता मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये तिच्या बणावाचा भांडाफोड झाला.(Latest Marathi News)

टिटवाळा जवळ बल्याणी परिसरात परिसरात प्रवीण मोरे व प्रणिता मोरे हे पती पत्नी राहत होते. प्रणीलला दारूचे व्यसन होते. प्रवीण दारू पिऊन प्रणिताशी वाद घालायचा. तीन ऑगस्ट रोजी प्रवीण दारू पिऊन घरी आला त्याने प्रणिताची वाद घालण्यास सुरुवात केली. संतापलेल्या प्रणिताने प्रवीणची गळा आवळून हत्या केली.

Murder
Indian Student In US: आईच्या हाकेला सरकारचा प्रतिसाद, अमेरिकेत भरकटलेल्या विद्यार्थिनीला ग्रीन सिग्नल

हत्येचे कृत्य लपवण्यासाठी प्रणिताने दारू पिल्याने प्रवीणचा मृत्यू झाल्याचा भासवले. मात्र, प्रवीणच्या शवविच्छेदन अहवालामध्ये त्याची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले. टिटवाळा पोलिसांना प्रणितावर संशय आला. पोलिसांनी प्रणिताला ताब्यात घेत तिची चौकशी केली असता प्रणिताने प्रवीणची गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली.(Latest Marathi News)

पती दारू पिऊन वारंवार भांडण करत असल्याच्या रागातून पतीची हत्या केल्याची कबुली प्रणिताने दिली. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत प्रणिता मोरे हिला अटक केली आहे.

Murder
Amit Shah : ''इथेनॉल बनवणार नाही असा एकही साखर कारखाना महाराष्ट्रात असता कामा नये'' अमित शाहांचे स्पष्ट निर्देश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.