मृतदेह शोधण्यासाठी नौदलाचं अरबी समुद्रात मोठं ऑपरेशन

INS मकर युद्धनौका रवाना
मृतदेह शोधण्यासाठी नौदलाचं अरबी समुद्रात मोठं ऑपरेशन
Updated on

मुंबई: चक्रीवादळात बुडालेला बार्ज पी 305 (P 305 sank) व टगबोट वरप्रदा यांच्या शोधात समुद्रतळ तपासण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे घेऊन नौदलाच्या मकर (INS Makar) व तरस या दोन युद्धनौका निघाल्या आहेत. या जहाजांवरील सुमारे दोनशे खलाशांना वाचविल्यानंतर (sailors save) अजूनही सुमारे तीस खलाशी बेपत्ता आहेत. भरसमुद्रात चार-पाच दिवस अथक शोधकार्य करूनही त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे आता समुद्रतळाशी विसावलेल्या दोन जहाजांमध्येच हे मृतदेह आहेत का हे तपासले जाईल. (To find missing person on p 305 barje indian navys ins makar left for arabian sea)

त्यासाठी प्रथम ही जहाजे नेमकी कोठे बुडाली आहेत हे अत्याधुनिक सोनार यंत्रणांच्या शोधले जाईल. एकदा का त्या जहाजांचा ठावठिकाणा मिळाला की पुढील कार्यवाही केली जाईल. यासाठी कारवारहून आलेली नौका आयएनएस मकर आज हीरा तेलउत्खनन फलाटांच्या दिशेने रवाना झाली. अत्याधुनिक सोनार उपकरणे असलेली ही नौका समुद्राचे सर्वेक्षण करण्यासाठी वापरली जाते.

मृतदेह शोधण्यासाठी नौदलाचं अरबी समुद्रात मोठं ऑपरेशन
मुंबई: विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या API ची पगारवाढ रोखली

सोनार यंत्रणेच्या साह्याने समुद्रात अत्यंत उच्च क्षमतेच्या ध्वनीलहरी प्रक्षेपित केल्या जातात. समुद्रतळावर आपटून परत आलेल्या ध्वनीलहरींचा अभ्यास करून समुद्रतळात काय आहे हे शोधले जाते. त्याआधारे या बुडालेल्या नौकांचा माग काढता येईल व नंतर छोट्या पाणबुड्या तेथपर्यंत जाऊ शकतील. यासाठी मकर नौकेवर किमान तीस निष्णात पाणबुडे आहेत. त्याखेरीज नौदलाच्या अनेक युद्धनौका, हेलिकॉप्टर व टेहळणी विमाने अजूनही भरसमुद्रात बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.