कोश्यारींना मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी संजय राऊत राजभवनावर

व्यक्तीगत संबंध राजकारणाच्या पलीकडे असतात. हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे.
कोश्यारींना मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी संजय राऊत राजभवनावर
Updated on

मुंबई: शिवसेना नेते (Shivsena) आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) राज भवनावर (Raj bhavan) दाखल झाले आहेत. संजय राऊत आज संध्याकाळी अचानक राज भवनावर पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आज सकाळीच संजय राऊत यांनी सपत्नीक सिल्वर ओकवर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांची भेट घेतली होती.

संजय राऊत आधी शरद पवार नंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. पण संजय राऊत यांच्या सिल्वर ओक व राजभवन भेटीमागचं कारण कौटुंबिक आहे. लवकरच संजय राऊत यांच्या मुलीच लग्न आहे. मुलीच्या लग्नाची पत्रिका राज्यपालांना देण्यासाठी संजय राऊत राजभवनावर आले आहेत.

कोश्यारींना मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी संजय राऊत राजभवनावर
'स्पा' सेंटरमध्ये सेक्स रॅकेटला प्रोत्साहन, 'जस्टडायल'ला DCW कडून समन्स

संजय राऊत यांनी आतापर्यंत अनेकदा राज्यपालांवर टीका केली आहे. पण व्यक्तीगत संबंध राजकारणाच्या पलीकडे असतात. हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची ती परंपरा आहे. त्याच परंपरेला अनुसरुन संजय राऊत यांनी राज्यपालांना मुलीच्या लग्नाचं निमंत्रण दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.