आजपासून नेरुळ, बेलापूर-खारकोपर विभागात 8 उपनगरी सेवा धावणार

आजपासून नेरुळ, बेलापूर-खारकोपर विभागात 8 उपनगरी सेवा धावणार
Updated on

मुंबई: मध्य रेल्वेच्या नेरूळ, बेलापूर-खारकोपर विभागात 20 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून उपनगरी सेवा धावणार आहे. दोन दिवसांपूर्वीच मध्य रेल्वेनं उपनगरी सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नेरूळ - खारकोपर आणि बेलापूर - खारकोपर दरम्यान प्रत्येकी चार उपनगरी सेवा असे एकूण 8 सेवा असतील.

सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग, हार्बर मार्ग आणि ट्रान्सहार्बर मार्गावर दररोज 1572 उपनगरी सेवा चालवित आहे. चौथ्या मार्गिकेवर म्हणजेच नेरुळ,बेलापूर - खारकोपर मार्गावर 8 उपनगरी सेवा जोडल्या गेल्यानंतर 20 नोव्हेंबर पासून एकूण सेवा 1580 होणार आहे. 

दरम्यान राज्य शासनाने निश्चित केलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मान्य केलेल्या श्रेणी वगळता इतरांनी स्थानकांवर गर्दी करू नये, त्याशिवाय प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड 19 संबंधित सर्व निकषांचे पालन करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

असे असेल वेळापत्रक

  • नेरुळ येथून सकाळी 8.45 वाजता सुटेल तर खारकोपर येथे सकाळी 9.5 वाजता पोहोचेल
  • खारकोपर येथून सकाळी 9.15 वाजता सुटेल तर  नेरुळ येथे 9.35 वाजता पोहोचेल.
  • नेरूळ येथून दुपारी 5.45 वाजता सुटेल तर खारकोपर येथे सायंकाळी 6.5 वाजता पोहोचेल.
  • खारकोपर येथून सायंकाळी 6.15 वाजता सुटेल तर नेरुळ येथे सायंकाळी 6.35 वाजता पोहोचेल.
  • बेलापूर येथून सकाळी 9.32 वाजता सुटेल तर खरकोपर येथे 9.50 वाजता पोहोचेल.
  • खारकोपर येथून सकाळी 10 वाजता सुटेल तर  बेलापूर येथे सकाळी 10.18 वाजता पोहोचेल.
  • बेलापूर येथून सायंकाळी 6.32 वाजता सुटेल तर  खारकोपर येथे 6.50 वाजता पोहोचेल.
  • खारकोपर येथून 7 वाजता सुटेल तर  बेलापूर येथे 7.18 वाजता पोहोचेल.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

From today 8 suburban services will run in Nerul Belapur Kharkopar division

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.