आज मुख्यमंत्री मास्क काढून बोलतील: संजय राऊत

आज मुख्यमंत्री मास्क काढून बोलतील: संजय राऊत
Updated on

मुंबईः  आज शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर  सभागृहात केवळ ५० जणांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा दसरा मेळाव्याला संबोधित करतील. शिवसेना पक्षप्रमुख ते मुख्यमंत्री आणि शिवाजी पार्क ते सावरकर हॉल असा यंदाचा दसरा मेळावा असणार आहे. हा दसरा मेळावा कसा असणार आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मास्क काढून आज सर्व विषयांवर आपली भूमिका स्पष्ट करतील, असं राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच मी मागील दसरा मेळाव्याला बोलो होतो आमचा मुख्यमंत्री होणार आणि तो मुख्यमंत्री झालाच, असंही राऊत म्हणालेत. 

विरोधीपक्ष आम्हाला बोलतो आहे दसरा मेळावा का घेताय जणांची ना मनाची वाटते की नाही. आम्ही त्यांना बोलतो तुमचे सरसंघचालक काय करत आहेत त्यांना जणांची ना मनाची काही वाटत नाही का?, अशी टीकाही राऊतांनी केली आहे. 

आज शिवसेनेचा दसरा मेळावा 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा दसरा मेळाव्याला संबोधित करतील. शिवसेना पक्षप्रमुख ते मुख्यमंत्री आणि शिवाजी पार्क ते सावरकर हॉल असा यंदाचा दसरा मेळावा असणार आहे.

दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कात करण्याची परंपरा यावर्षी मात्र खंडीत होणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून संध्याकाळी सातच्या मुहुर्तावर हा मेळावा होईल.  ठाकरे कुटुंबियांतली पहिली व्यक्ती मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. यासाठीच शिवसेनेसाठी यंदाचा दसरा मेळावा खूप खास असणार आहे. त्यामुळे या मेळाव्यात ठाकरे कोणाकोणावर बाण चालवणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी ६.३० वाजता सहपरिवार शिवाजी पार्क येथील हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला मानवंदना देतील आणि मग ठीक ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहातून त्यांच्या भाषणाला सुरुवात होईल. 

इलेक्ट्रॉनिक चॅनेल्सच्या पत्रकारांसाठी बाजूलाच म्हणजे संयुक्त महाराष्ट्र दालन येथे पत्रकार कक्ष उभारण्यात आला आहे. पत्रकार कक्षातून प्रसार माध्यमे थेट प्रक्षेपण करु शकणार आहेत. छायाचित्रकारांना स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात प्रवेश बंदी असल्याचंही शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं.

Today Chief Minister will take off his mask and speak Shivsena mp Sanjay Raut

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.