आजपासून 'या' स्थानकादरम्यान लोकलच्या अधिक फेऱ्या; जाणून घ्या सविस्तर माहिती

आजपासून 'या' स्थानकादरम्यान लोकलच्या अधिक फेऱ्या; जाणून घ्या सविस्तर माहिती
Updated on


मुंबई : विरार ते डहाणूदरम्यान रेल्वे प्रवास करणार्‍या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना दिलासा देणारा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. या मार्गावर पालघरपासून प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गुरुवारपासून (ता.16) दोन मेमूच्या अतिरिक्त फेर्‍या चालविण्यात येणार आहे. यापैकी एक मेमू विरार ते डहाणूसाठी रात्री 10.55 ला सुटेल; तर दुसरी मेमू डहाणू ते विरारसाठी पहाटे 4.50 मिनिटांनी धावणार आहे. लाॅकडाऊनमध्ये या दोन मेमूच्या अतिरिक्त फेर्‍यांमुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 
पश्चिम रेल्वे मार्गावर डहाणू, वानगाव, बोईसर, उमरोली, पालघर, सफाळे, वैतरणा येथून बोरिवली, अंधेरी येथील शताब्दी रुग्णालय, भगवती हॉस्पिटल, बोरिवली, ओशिवरा कूपर, नायर, केईएम सायन अशा अनेक रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, सफाई कामगार दररोज प्रवास करीत असतात; मात्र त्यांच्या वेळेनुसार लोकल सेवा नसल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे त्यांच्या वेळेनुसार लोकल सेवा सुरू करण्याची मागणी कर्मचार्‍यांनी  केली होती. त्यासंबंधित पत्रसुद्धा पश्चिम रेल्वे प्रशासनाला देण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील डहाणू रोडवरून चर्चगेटकडे जाण्यासाठी पहाटे 5, सकाळी 11.30 आणि सायंकाळी 6.10 वाजता लोकल सोडण्यात यावी; तर परतीचा प्रवास करण्यासाठी बोरिवलीवरून सकाळी 7.38, दुपारी 2.30 आणि रात्री 9.10 वाजता डहाणूसाठी लोकल सेवा असावी, अशी मागणी वैद्यकीय कर्मचार्यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीची दखल घेत पश्चिम रेल्वे प्रशासनाने आता विरार ते डहाणू दरम्यान मेमूच्या 2 फेर्‍या वाढविल्या आहेत. विरार स्थानकातून रात्री 10.55 ला सुटलेली मेमू डहाणू स्थानकात रात्री 12.05 वाजता पोहोचणार आहे; तसेच डहाणु येथून पहाटे 5.50 मिनिटांनी सुटलेली गाडी विरार स्थानकात सकाळी 6 वाजता पोहोचणार आहे.

पश्चिम रेल्वेवर 350 लोकल फेर्‍या
अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी 15 जून पासून मर्यादित लोकल प्रवास सुरु करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर दररोज लोकलच्या 350 फेर्‍या चालविण्यात येतात. त्यापैकी 161 फेर्‍या चर्चगेट ते विरार दरम्यान धावतात. 7 फेर्‍या नालासोपारा ते चर्चगेट, वसई रोड, विरार हून चर्चगेटकरिता प्रत्येकी 2 फेर्‍या, विरार, वसई रोज ते बोरीवलीदरम्यान प्रत्येकी 2 फेर्‍या, चर्चगेट ते बोरीवली दरम्यान 134 फेर्‍या, महालक्ष्मी ते बोरीवली 6, चर्चगेट ते डहाण रोड 6, बोरीवली ते डहाणू 2, विरार ते डहाणू दरम्यान 28 फेर्‍या धावत आहेत.

-----------------------------

(संपादन - तुषार सोनवणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.