High-Court-Mumbai
High-Court-Mumbaisakal media

प्रेम प्रकरणात मैत्रिणीच्या घरात घुसून हत्या; जन्मठेपेची सजा कायम

Published on

मुंबई : प्रेम प्रकरणातून मैत्रिणीच्या घरात घुसून तिची हत्या (Murder crime) केल्याप्रकरणी आरोपीला सुनावलेली जन्मठेपेची सजा (sentenced to life imprisonment) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) कायम ठेवली आहे. न्या. एस. एस. जाधव आणि न्या. पी. के. चव्हाण यांच्या खंडपीठापुढे आरोपी एक्विनो मार्टिस (वय ३४) याच्या अपील याचिकेवर (Petition) सुनावणी झाली. ठाणे सत्र न्यायालयाने सन २०१२ मध्ये त्याला सबळ पुराव्याच्या आधारावर जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

High-Court-Mumbai
कंत्राटी चालक-वाहकांचा एसटीच्या उत्पन्नावर डल्ला; तपासणी वाढवण्याचे आदेश

अभियोग पक्षाने दाखल केलेले पुरावे सबळ आहेत, असे निरीक्षण खंडपीठाने व्यक्त केले आहे. २८ जानेवारी २००८ मध्ये मार्टिसने पलोमा फर्नांडिस हिचा ठाण्यातील निवासस्थानी चाकूने हल्ला करत खून केला. त्यानंतर त्याने स्वतःला मारण्याचाही प्रयत्न केला. मात्र तेथील सुरक्षा रक्षकाने त्याला अडवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी आणि मयत मैत्रिणीमध्ये काही दिवसांपासून वाद झाले होते आणि तिचे एटीएम कार्डदेखील हरवले होते. या खटल्यामध्ये सुरक्षा रक्षकाची जबानी महत्त्वाची ठरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()