Court
Courtsakal media

मुंबई : हिणवणाऱ्या पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला शिक्षेत सवलत

Published on

मुंबई : पत्नीने आक्षेपार्ह शब्दांत हिणवल्यामुळे रागाच्या भरात तिचा खून (Wife Murder) केल्याप्रकरणात पतीला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा (Life imprisonment) उच्च न्यायालयाने (Mumbai high court) दहा वर्षे केली आहे. पत्नीने केलेल्या विधानांमुळे संतप्त होऊन पतीने हत्या केली, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. आरोपी प्रवीण चौहान आणि त्याच्या पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण (husband-wife quarrel) झाले होते. पत्नीने पत्नीला आक्षेपार्ह शब्दांत हिणावले आणि चाकूही उगारला. त्यामुळे अहंकार दुखावल्याने आरोपीने पत्नीचा खून केला. या प्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

Court
दिवंगत बप्पी लाहरींच्या नातवाचं आपल्या 'दादू'ला इमोशनल पत्र!

सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात आरोपीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेवर नुकतीच न्या. साधना जाधव आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. पत्नीने आक्षेपार्ह शब्दांत हिणवल्यामुळे आरोपीने रागाच्या भरात हत्या केली. घटनेनंतर आरोपीने पोलिसांपुढे कबुली देत पत्नीचा मृतदेह देखील दाखवला आणि तिच्या माहेरीदेखील पोलिसांना घेऊन गेला होता; परंतु आरोपीला त्याच्या कृत्याचा पश्चाताप झाल्याचे दिसते. त्यामुळे या घटनेत कटकारस्थान दिसत नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे मत खंडपीठाने व्यक्त केले. त्यामुळे उच्च न्यायालयाने आरोपीला सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द करूच दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

वाढत्या प्रकरणावर चिंता

उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या अशा प्रकारच्या अपील याचिकांचे प्रमाण वाढले आहे. त्यातही पत्नीच्या बोलण्यामुळे रागाच्या भरात हत्येची प्रकरणे देखील वाढली आहेत, अशी चिंता खंडपीठाने व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.