raosaheb danve
raosaheb danvesakal media

नागरिकांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारसोबत चर्चा; रावसाहेब दानवे यांची माहिती

Published on

मुंबई : रेल्वेच्या जागांवर (slum at railway land) हजारो लोकांनी झोपड्या थाटल्या आहेत. त्या लोकांना पर्यायी राहण्याची व्यवस्था करण्यात यावी, तोपर्यंत स्थलांतरित करण्यात येऊ नये, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb danve) यांना केली. नागरिकांचे पुनर्वसन हा विषय राज्य सरकारचा (Maharashtra Government) असल्याने आम्ही यासंदर्भात चर्चा करणार आहोत, असे दानवे यांनी सांगितले.

raosaheb danve
मानखुर्द : घरभाडे देण्यास पैसे नसल्याने मुलाचे अपहरण

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात येत आहेत. रेल्वेने २६ हजार ८९९ अतिक्रमणांना जागा रिकाम्या करण्याची नोटीस बजावली असून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे. मात्र, या कारवाईविरोधात लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून विरोध होत आहे. त्यामुळे शेकडो नागरिकांचा पुनर्वसन हा विषय ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी, (ता.१६) भाजपचे शिष्टमंडळ रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भेटले. सदर कारवाई थांबविण्याची विनंती केली.

सर्व लोकांना पर्यायी जागा द्यावी, तोपर्यंत लोकांना स्थलांतरित करू नयेत, अशी मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन आणि कायद्याच्या चौकटीत राहून लोकांना न्याय दिला जाईल, असे दानवे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.