IPS Saurabh Tripathi
IPS Saurabh TripathiSakal media

अंगाडिया खंडणी प्रकरण : सौरभ त्रिपाठींचा अटकपूर्व जामीन नामंजूर

Published on

मुंबई : अंगाडिया खंडणी प्रकरणातील (extortion case) आरोपी निलंबित पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी (saurabh Tripathi) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai session court) आज नामंजूर केला. या प्रकरणात अटक असलेल्या तीन पोलिस कर्मचारी आरोपींनी त्रिपाठी यांचा उल्लेख केला असून त्यांच्या सांगण्यावरून वसुली केल्याचा दावा केला आहे. न्या. सदराणी यांनी त्रिपाठी यांचा जामीन नामंजूर केला. पोलिसांच्या वतीने सरकारी वकील अभिजित गोंदवाल यांनी जामीन अर्जाला विरोध केला होता.

IPS Saurabh Tripathi
नवीन गृहप्रकल्‍प तहानलेलेच! सिडको वसाहतींच्या तोंडचे पाणी पळाले

अटकेतील आरोपी ओम वंगाटे यांनी त्रिपाठी यांचे नाव घेतले असून अन्य आरोपींनींही त्यांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे या प्रकरणात त्यांची चौकशी आवश्यक आहे, असा दावा वकील गोंदवाल यांनी केला होता. त्रिपाठी यांच्या वतीने ॲड. अनिकेत निकम यांनी सर्व आरोप खोटे असून जाणीवपूर्वक केले जात आहेत, असा युक्तिवाद केला आहे.

त्रिपाठींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून तेव्हापासून ते गैरहजर आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर युनिटने (सीआययू) त्रिपाठी यांना फरारी घोषित केले आहे. एलटी मार्ग पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला गेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()