Mumbai Zoo
Mumbai Zoosakal media

मुंबई : राणीच्या बागेत प्राण्यांसाठी `गारेगार मेवा`; फ्रूट आईस केक, लॉलीपॉपची व्यवस्था

Published on

मुंबई : वाढत्या उष्म्याने (summer hit) फक्त माणसेच नाही, तर प्राणीही त्रस्त आहेत. या वाढत्या तापमानाचा (Temperature Hit) प्राण्यांच्या आरोग्यावरदेखील (Animal Health) परिणाम होतो. उन्हाच्या वाढत्या काहिलीचा फटका भायखळ्यातील माता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयातील (Mumbai Zoo) पशू-पक्ष्यांनाही बसत आहे. त्याच अनुषंगाने विशेष काळजी म्हणून पशू-पक्ष्यांसाठी फळे, फ्रूट आईस केक (Fruit ice cake), लॉलीपॉपची (Lollypop) व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी दिवसभरातील खाण्याचे वेळापत्रक आखण्यात आले असून त्यानुसार प्राण्यांना गारेगार खाद्य पुरवले जात असल्याची माहिती झू बायोलॉजिस्ट अभिषेक साटम यांनी दिली.

Mumbai Zoo
बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त

काही दिवसांपूर्वीच राणीच्या बागेला नवी झळाळी देण्यात आली आहे. त्यात प्राण्यांची योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. उन्हाळ्यात प्राण्यांना अधिकाधिक सावली मिळेल, यासाठी शेडची व्यवस्थाही करण्यात आली; तर बऱ्याच ठिकाणी वाहत्या पाण्याची व्यवस्था आहे. यामुळे प्राणी वाहत्या पाण्यात जाऊन आपले उन्हापासून संरक्षण करू शकतात. प्राण्यांची दैनंदिन गरज आणि आरोग्य लक्षात घेऊन बागेतील काम करण्यात आले आहे. त्यामुळे पशू-पक्ष्यांना सर्व प्रकारचे संरक्षण मिळत असल्याचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.

नैसर्गिक अधिवासात असलेल्या प्राण्यांना वाढत्या उन्हाचा फारसा त्रास होत नाही. त्यांना जंगलात नैसर्गिक अधिवास असल्याने झाडे, ओढे यांच्या मदतीने स्वतःच्या समस्या स्वतः सोडविणे शक्य असते. उद्यानातील किंवा पिंजऱ्यातील प्राण्यांना उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होऊ शकतो. उष्णता वाढल्यास त्वचेचे आजार, डीहायड्रेशचा त्रास होतो. यासाठी त्यांच्या आरोग्याची दैनंदिन तपासणीदेखील केली जाते. शिवाय त्यांच्या तब्येतीला आवश्यक केळी, चिकू, भोपळा, आंबा, कलिंगड तसेच शहाळ्याच्या पाण्यापर्यंत सर्वकाही दिमतीला ठेवले जात आहे.

Mumbai Zoo
वसईकरांचा मुंबई प्रवास अधिक वेगवान; उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास

दैनंदिन आहार तोच...

१) प्राण्यांच्या शरीरात थंडगार पदार्थ जावेत, यासाठी हत्तींच्या आहारात कलिंगड आणि शहाळी देण्यात येत आहेत. माकडांसाठी खास फळांच्या लॉलीपॉपचा बेत करण्यात आला आहे; तर इतर सर्व प्राण्यांनाही गारेगार अनुभव देणारा ‘आइस केक’ दिला जात आहे. यात अस्वलांसाठी खास फ्रूट आईस केक, पिंजऱ्यातील वाघ आणि बिबट्यांसाठी मांसाहारी फ्रूट आईस केकची व्यवस्था करण्यात आली आहे.
२) प्राण्यांच्या दैनंदिन आहारात फारसा बदल करण्यात आलेला नाही. त्यांच्या आवडीचा आहार त्यांना सुरूच आहे. केवळ वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी वेगळी थंडगार मेजवानी दिली जात आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी प्राण्यांना खास फळांचा मेवा ही दिला जातो. कलिंगड, पपई, केळी, चिकू, आंबा अशा फळाचे तुकडे करून त्यामध्ये गुळाचा पाक टाकून प्राण्यांना खुश ठेवले जात आहे.

...असे बनते आईस केक, लॉलीपॉप
१) प्राण्यांच्या आवडीच्या फळांचे तुकडे करून त्यांचे मिश्रण केले जाते. हे मिश्रण गोठवून त्याचा ‘आईस केक’ बनविण्यात येतो.
२) किवी, ड्रॅगन फ्रूट, आंबा, कलिंगड यांच्या रसामध्ये मध टाकून त्यापासून ‘लॉलीपॉप’ बनवून माकडांना देण्यात येत आहेत.
३) पाणघोड्यांच्या आहारात भोपळ्याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच माकडांसाठी आंबे, भुईमुगाच्या शेंगा टाकल्या जात आहेत.

बागेची पशू-प्राणी संपदा
१३ जातींचे ८४ सस्तन प्राणी
१९ जातींचे १५७ पक्षी
७ जातींचे ३२ सरपटणारे, जलचर प्राणी
एकूण २७३ प्राणी/पक्षी
बागेचे एकूण क्षेत्र : ५२०० चौरस मीटर
अंतर्गत पॉकेट गार्डन्स : ६४
झाडांची संख्या: ४१३२
दुर्मिळ झाडांची संख्या : २९१
ॉऔषधी झाडांची संख्या : १५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.