पर्यावरण जैवविविधता व संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी गोवा सायकलिंग अभियानाला सुरुवात. चाळीस विद्यार्थी सहभागी
महाड : गोव्यातील पर्यावरण अभ्यास, साहस आणि तेथील संस्कृतीचा आभ्यास करण्यासाठी सीस्केप संस्था आणि यूथ हॉस्टेलच्या महाड विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता नऊ दिवसांची ‘गोवा सायकलिंग मोहीम’ घेण्यात आली आहे. यामध्ये ४० विद्यार्थी सहभागी झाले. सीस्केपच्या मोहिमेचा पहिला दिवस बुधवारी पणजी येथून सुरू झाला. सपना शेठ, यश म्हसकर हे शिबिरप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. प्रतीक देसाई, चिराग बाईत, अनुराग मोरे, वीर जाधव, साहिल चोपडे, भार्गव मेहता यांच्यासह ४० जणांनी यामध्ये सहभाग नोंदवला. सर्व विद्यार्थी गोव्यातील किल्ल्यांचे दर्शन करणार आहेत. यामध्ये रईस मागोस ते अगोंदा किल्ला असे ४२ किलोमीटरचे अंतर पार करतील. दुसऱ्या दिवशी डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य तसेच चार बेटांवर सफर करून तेथील जैवविविधता अनुभवणार आहेत. यामध्ये कांदळवनाची भ्रमंती करण्यात येणार आहे. अन्य दिवशीही गोवा दर्शन हे विद्यार्थी करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.