मदारी मोर्चाचे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न हाणून पाडला,

मदारी मोर्चाचे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न हाणून पाडला,

Published on
मदार मोर्चाचे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न हाणून पाडला खासदार संभाजीराजे यांच्या पत्रांमुळे पुरातत्त्व विभागाची तत्काळ कारवाई महाड, ता. ६ (बातमीदार) ः स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगड येथील ‘मदार मोर्चा’ या ठिकाणी काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी रंगरंगोटी करून चादर घालून तिथे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या बांधकामावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाकडे त्यांनी या मागणीचे पत्र पाठवले आहे. खासदार संभाजीराजे यांचे पत्र मिळताच पुरातत्त्व विभागाने तातडीने या ठिकाणची रंगरंगोटी हटवली आहे. रायगडावरील ‘मदार मोर्चा’ येथे असे प्रकार घडत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील व्हायरल झाला होता. तसेच काही शिवप्रेमींनीदेखील खासदार संभाजीराजे यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज पुरातत्त्व विभागास पत्र लिहिले आहे. या पत्रामधून त्यांनी रायगडावरील बेकायदा बांधकामासंदर्भात आक्षेप घेतला. संभाजीराजे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरदेखील हे पत्र प्रसिद्ध केले आहे. ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाच्या नियमांमध्ये या गोष्टी प्रतिबंधित असताना, किल्ले रायगडसारख्या ऐतिहासिक ठिकाणी अशा गोष्टी होणे अतिशय चुकीचे आहे. किल्ले रायगडचे पावित्र्य व ऐतिहासिक महत्त्व अबाधित राहावे यासाठी ‘मदार मोर्चा’ या ठिकाणी करण्यात आलेली रंगरंगोटी हटवून तिथे कोणत्याही प्रकारचे नवीन बांधकाम अथवा रचना करण्यास तत्काळ पायबंद घालण्यात यावा, अशी मागणी या पत्रामधून पुरातत्त्व विभागाच्या अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई विभागाचे अधीक्षक तसेच नवी दिल्लीमधील भारतीय पुरातत्त्व विभागाच्या महासंचालकांना संभाजीराजेंनी हे पत्र पाठवले आहे. तत्काळ कारवाई दुर्गराज रायगडवरील मदार मोर्चा येथील प्रकाराबाबत आज सकाळीच पुरातत्त्व विभागास पत्र लिहून केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या महासंचालिका विद्यावती व मुंबई विभागाचे अधीक्षक पुरातत्त्वशास्त्रज्ञ राजेंद्र यादव यांच्याशी खासदार संभाजीराजे यांनी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचित केले होते. यास प्रतिसाद देत पुरातत्त्व विभागाने मदार मोर्चा येथील रंगरंगोटी हटवून ते ठिकाण पूर्ववत केलेले आहे. तसेच त्या ठिकाणी सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात आलेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()