रायगड : उद्यापासून शाळेत होणार विद्यार्थ्यांचा किलबिलाट
अलिबाग : रायगड जिल्ह्यात कोरोना संसर्ग (corona infection) कमी होऊ लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा सोमवारी (ता.३१) पुन्हा सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर (dr mahendra kalyankar) यांनी दिले. यामुळे पहिलीपासूनच्या वर्गात किलबिल सुरू (school starts) होणार आहे. कोरोना नियमांचे पालन करण्याच्या (corona rules) सूचना शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांना दिल्या आहेत. रायगड जिल्ह्यात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने डोके वर काढले. दररोज दीड ते दोन हजार रुग्ण सापडू लागले. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे चिंता निर्माण झाली होती.
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येचा विचार करीत डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दहावी व बारावीचे वर्ग वगळता पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग बंद करण्याचे आदेश दिले. १६ जानेवारीपासून तिसरी लाट ओसरू लागली असून दिवसाला ४०० पर्यंत रुग्ण सापडू लागले आहेत. यामुळे महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यातील बंद झालेल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. २० जानेवारीच्या परिपत्रकानुसार शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता, सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
स्वच्छता, सुरक्षेबाबत उपाययोजना पुढील - शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा उपलब्ध करणे. - शाळेत हात धुण्याची सुविधा उपलब्ध करणे. - तापमापक, जंतुनाशक, साबण, पाणी आदी आवश्यक वस्तूंची उपलब्धता करणे. - शाळेतील शिक्षकांची ४८ तासांपूर्वी आरटीपीआर चाचणी आवश्यक. -एका बाकावर एक विद्यार्थी अशी बैठक व्यवस्था. - मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग आवश्यक. - पालकांची संमती व पालकांनी दक्षता घ्यावी. - आजारी पाल्याला शाळेत पाठवू नये.
पहिली ते बारावीच्या शाळा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी पत्राद्वारे कळविले आहे. त्यानुसार मार्गदर्शक सूचनांचे पालन करून पनवेल महापालिका क्षेत्र वगळून जिल्ह्यातील इतर भागांतील शाळा ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्याचेही आदेश आहेत.
- जोत्स्ना शिंदे-पवार, शिक्षणाधिकारी, रायगड जिल्हा परिषद, प्राथमिक व माध्यमिक विभाग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.