Fisherman
FishermanSakal media

अलिबाग : मच्छीमारांसमोर आर्थिक संकट; ऐन हंगामात जाळे रिकामे

Published on

अलिबाग : जानेवारी ते मे दरम्यान बांगडा, ढोमा, मुशी आणि जवळ्याचा हंगाम असतो. या कालावधीत मिळणाऱ्या मासळीतून मच्छीमार (Fisherman in alibag) वर्षभराची कमाई करतात. यंदा बदलत्या वातावरणाबरोबरच समुद्रातील प्रदूषणामुळे ऐन हंगामात जाळ्यात मासळीच मिळत नसल्याने मच्छीमारांसमोर मोठे आर्थिक संकट (Financial crisis) उभे राहिले आहे. दीड महिन्यापासून रायगड (Raigad) जिल्ह्यात वातावरणामध्ये प्रचंड बदल होऊ लागला आहे. जोरदार वाऱ्याबरोबरच कधी थंडी, तर कधी ऊन असा बदल होत आहे. त्याचा परिणाम मासेमारीवर झालेला दिसतो.

Fisherman
पुणे : बसला लागलेली आग विझविताना अग्निशामक दलाचे प्रमुख अधिकारी जखमी

मुशी, बांगड्याचा हंगाम असला तरी गेल्या दोन महिन्यांत हे मासे खूप अल्प प्रमाणात मिळत आहेत. मच्छीमार रिकाम्या हातीच परत येतात. या परिस्थितीमुळे डिझेलचा खर्चदेखील परवडत नाही. मार्च ते मे या महिन्यांमध्ये जवळा जाळ्यात येतो; परंतु वातावरणात बदल झाल्याने जवळादेखील मिळेल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे सरकारने मासळीचा दुष्काळ घोषित करून भरपाई द्यावी, अशी मागणी रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे
अध्यक्ष शेषनाथ कोळी यांनी केली आहे. मासळी मिळत नसल्याने येत्या काळात बाजारात २० टक्क्यांनी भाव वाढण्याची शक्यता आहे.

बांगडा, मुशी, जवळा ही मासळी जानेवारी ते मे या महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मिळते; परंतु सतत वाढणारी थंडी, उष्णतेमुळे मासळी जाळ्यात येत नाही. त्याचा परिणाम मासेमारीवर होण्याची भीती आहे. डिझेलचा खर्चदेखील परवडत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
- नयन नाखवा, मच्छीमार.

हवेत गारवा निर्माण होण्याबरोबरच वातावरणात सतत बदल होत आहे. या बदलामुळे काही मासळी खोल समुद्रात जाते, तर काही मासळी तळ गाठते. त्यामुळे मासे समुद्रात असूनदेखील मिळत नसल्याची परिस्थिती आहे. जानेवारी ते मार्च हा मुशी, बांगड्याचा हंगाम असून मार्च ते मे हे महिने जवळा मिळण्याचा हंगाम आहे.
- सत्यजित पेरेकर, मच्छीमार

Fisherman
मुरबाडमधील एटीएम दरोड्याप्रकरणी आरोपींना तीन वर्षे कारावास

दृष्टिक्षेप

- रायगड जिल्ह्यामध्ये तीन हजारपेक्षा अधिक मासेमारी बोटी
- बोटींवर सुमारे २५ हजारपेक्षा अधिक कामगार
- मासळी उतरविणे, वाहतूक करणे, मासळी सुकविणे आदी कामांमुळे मोठी रोजगार निर्मिती
- मासेमारीवर सुमारे एक लाखापेक्षा अधिक नागरिकांना रोजगार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.