Nabhik community protest
Nabhik community protestsakal media

नाभिक समाजाबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य; केंद्रीय मंत्र्याविरोधात अलिबागमध्ये निदर्शने

Published on

अलिबाग : केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जालना येथे कार्यक्रमात नाभिक समाजाबद्दल (Nabhik community) वादग्रस्त व्यक्तव्य केले, असा आरोप करून त्यांच्या निषेधार्थ अलिबागमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्री संत सेना महाराज नाभिक समाज संस्थेच्या वतीने मंगळवारी निदर्शने (Protest at alibag) करण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार सचिन शेजाळ यांना निवेदन देण्यात आले.

Nabhik community protest
आयटीसी हॉटेल, सीआयआय तर्फे हॉटेल डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू

श्री संत सेना महाराज नाभिक समाज संस्थेचे अध्यक्ष वैभव मुकादम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हा सहसचिव संतोष पवार, तालुका उपाध्यक्ष संदीप कदम, तालुका महिला अध्यक्ष वीणा आयरकर, सचिव संदीप साळुंके, अशोक हुजरे, नरेश पवार, विलास आयरकर, प्रदीप जाधव, प्रशांत शिंदे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

जालना येथे झालेल्या कार्यक्रम दानवे यांनी नाभिक समाजाबाबत दानवे यांनी बेताल वक्तव्य केले. त्यामुळे नाभिक समाजाची भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांनी नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी; अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.