अलिबाग : महामार्गांसह राज्य आणि इतर मार्गांवरील वाढते अपघात (Accidents) रोखण्यासाठी रायगड जिल्हा वाहतूक शाखेने ‘रायगड ब्लॅक स्पॉट‘ अॅपची (Raigad black spot application) मदत घेतली आहे. या अॅपमुळे चालकाला दोनशे मीटर अंतरावर असताना अपघातप्रवण क्षेत्राची माहिती मिळणार आहे. यासाठी माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रनिकेतन विद्यालयातील (dr babasaheb ambedkar college) तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. जिल्ह्यात अशी २८ ठिकाणे आहेत.
रायगड जिल्ह्यामध्ये औद्योगीकरण वाढल्याने अवजड वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यटकांच्या वाहनांची संख्याही मोठी आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण अधिक आहे. वाहतुकीच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष आणि अपघातप्रवण भागांच्या माहितीचा अभावही यासाठी कारण ठरतो. त्यामुळे यावर जिल्हा वाहतूक शाखेने उपाय शोधला आहे. पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडेकर यांच्या संकल्पनेतून एक अॅप तयार करण्यात येणार आहे. पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनानुसार हे काम सुरू होत आहे; तर लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रनिकेतन विद्यापीठातील तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे. या ॲपमुळे अपघातप्रवण क्षेत्राची माहिती २०० मीटर अगोदर कळणार आहे.
अपघातावर दृष्टिक्षेप (२०१९ ते २०२१)
मार्ग - एकूण अपघात - मृत्यू - जखमी
मुंबई- पुणे द्रुतगती मार्ग - १२७ - ५७- १६७
मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्ग ०४ - ३८ - २२- ६०
मुंबई - गोवा महामार्ग - १२७- ५३- १९८
राज्य मार्ग - १३ - ०४ - १०
इतर मार्ग - ०८ - ०४ - ०८
रायगड जिल्ह्यात २८ अपघात स्थळे आहेत. त्यावरील अपघात रोखण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार ‘रायगड ब्लॅक स्पॉट’ अॅप सुरू करण्यात येत आहे. यासाठी लोणेरे येथील विद्यापीठातील तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे. ते चालकांसह पर्यटकांना फायदेशीर ठरणार आहे.
- अश्वनाथ खेडेकर, पोलिस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.