रायगड : अवघ्या पाच तासांत हेलिकॉप्टरने अष्टविनायक दर्शन
पाली : अष्टविनायक दर्शनासाठी (Ashtavinayak Darshan) किमान दोन दिवस खर्च होतात; पण आता वेळेची बचत होणार आहे. ‘वरद हेलिकॉप्टर सर्विसेस’ (Varad Helicopter Services) या कंपनीने अवघ्या पाच ते सात तासांत भाविकांना दर्शन व्हावे यासाठी हेलिकॉप्टर सज्ज केली आहेत. या सेवेची सुरुवात बुधवारी (ता.३०) झाली. या प्रवासाठीचे तिकीट दर (Ticket fare) लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. वरद हेलिकॉप्टर सर्विसेसच्या हेलिकॉप्टर अष्टविनायक दर्शनासाठी ओझर येथून सकाळी ८.४६ वाजता पहिले उड्डाण केले. बी. व्ही. मांडे, वसंतराव पोखरकर, मीरा पोखरकर, डॉ. सदानंद राऊत, डॉ. पल्लवी राऊत या पाच भाविकांना घेऊन हे हेलिकॉप्टर दुपारी १.४५ वाजता पालीत पोहचले.
बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. धंनजय धारप, उपाध्यक्ष विनय मराठे, विश्वस्त राहुल मराठे, सचिन साठे व माधव साने यांच्यासह शेखर सोमण व देवस्थान कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. मांडे यांनी येथील हेलिपॅड व व्यवस्थापनाचे कौतुक केले. १४ जणांनी या हेलिकॉप्टरद्वारे दर्शनासाठी आगाऊ आरक्षण केले आहे. अनेक जण याबाबत विचारणा करत आहेत, अशी माहिती दिली. हेलिकॉप्टर पाहण्यासाठी पालीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जे भाविक या हेलिकॉप्टर सेवेचा लाभ घेतील त्यांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा अष्टविनायक देवस्थान ट्रस्टतर्फे पुरविण्यात येणार आहेत. यामुळे भाविकांच्या प्रवासातील वेळेची बचत होणार आहे.
वरद हेलिकॉप्टर सर्विसेस’ ही हेलिकॉप्टर प्रवासाची चांगली सेवा देत आहे. सामान्य माणसाच्या मनामध्ये हेलिकॉप्टर प्रवासाची भीती असते. अनेक वृद्धांना तर आणखी भीती असते; पण आम्ही सत्तरीच्या पुढचे आहोत. रक्तदाब व इतर आजाराचा प्रवाशांना यामध्ये काही त्रास होत नाही. या सेवेचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा.
- बी. व्ही. मांडे, हेलिकॉप्टर प्रवासी भाविक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.