मुंबई : निर्बंध हटविल्याने पुन्हा मोकळा श्वास; नवीन रुग्णसंख्या शून्यावर
अलिबाग : कोरोना साथीमुळे (corona pandemic) दोन वर्षांपासून रायगड जिल्ह्यात कडक निर्बंध होते. आता नवीन रुग्ण संख्या (corona new patients) शून्यापर्यंत आली असल्याने एक एप्रिलपासून राज्य सरकारने हे निर्बंध हटविले आहेत. यामुळे दिलासा मिळालेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. मार्च २०२० पासून कोरोनाचे संकट आले. साथीच्या पहिल्या लाटेत (corona first wave) जिल्ह्यात शेकडो नागरिकांना जीव गमवावा लागला.
त्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला. गावेच्या गावे कोरोनाबाधित झाल्याने चिंतेचा विषय झाला होता; तर डिसेंबर २०२१ मध्ये शेवटच्या आठवड्यात तिसऱ्या लाटेने डोके वर काढले. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख १५ हजार ३१० जणांना कोरोनाची लागण झाली. त्यात चार हजार ६९८ जणांचा मृत्यू झाला, असून एक दोन लाख १० हजार ५५५ जणांनी कोरोनावर मात केली.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्ह्यामध्ये मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले होते. सोशल डिस्टन्सिंगवर भर देण्यात आला होता. वेगवेगळ्या कार्यक्रमांवर बंदी घातली होती.
पेण तालुक्यातील स्वप्नील म्हात्रे यांनी सांगितले की, सरकारने कोरोना संदर्भातील निर्बंध हटविले आहेत. हा सरकारचा निर्णय स्वागतार्ह असला, तरीही कोरोना पूर्णपणे हद्दपार झाला नाही. नागरिकांनी स्वतःच्या व समाजाच्या आरोग्यासाठी मास्क लावणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे,
अशीच प्रतिक्रिया सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्त करत आहेत.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे रायगड जिल्ह्यात निर्बंध लावण्यात आले होते; परंतु कोरोना आता आटोक्यात आल्याने निर्बंध हटविण्यात आले. मास्क वापरणे ऐच्छिक केले आहे. निर्बंध हटविल्यामुळे दिलासा मिळाला आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत आहे; परंतु नागरिकांनी काही कार्यक्रम, सण, उत्सव साजरे करताना पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घ्यावी.
- किशोर अनुभवणे, अलिबाग
सरकारने निर्बंध हटविले असले तरीही कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. नागरिकांनी गर्दीत जाताना आजार असल्याने लांब राहणे आवश्यक आहे. सर्दी, खोकला, ताप असल्यास मास्क वापरणे आवश्यक आहे. काळजी घेऊन मुक्तपणे फिरणे आवश्यक आहे. पण स्वतःची काळजी घेऊनच वावरणे गरजेचे आहे.
- डॉ. राजाराम हुलवान.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.