कर्जत : उल्हास नदीच्या सुशोभीकरणासाठी 10 कोटी; सर्पोद्यानासाठीही निधीची तरतूद
कर्जत : उल्हास नदी (ulhas river) परिसराचे कर्जत तालुक्यात सुशोभीकरण करण्यासाठी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पर्यटन विकास निधीतून तब्बल दहा कोटी रुपये; तर सर्पोद्यानासाठी (zoo) तीन कोटींची तरतूद केली आहे. लोणावळ्याच्या दऱ्याखोऱ्यात उगम पावलेली उल्हास नदी कर्जत शहरातून मार्गक्रमण करत पुढे बदलापूर आणि त्यानंतर कल्याणच्या खाडीला (kalyan creek) मिळते. प्रदूषणामुळे तिचा (pollution) जीव गुदमरला आहे.
यामुळे शहरात संताप व्यक्त करण्यात येतो. हा प्रश्न पालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपस्थित होतो. मात्र, आश्वासने हवेत विरली. आदित्य ठाकरे यांनी आता उल्हास नदी परिसर सुशोभीकरण आणि सर्पोद्यान यासाठी निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पामुळे उल्हास नदी जल संर्वधनास मदत होईल. शहराच्या सौंदर्यातही भर पडेल. त्यामुळे हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.
प्रतिआळंदीमुळे पर्यटन केंद्र
उल्हास नदी पात्रातील बंधारा परिसरात आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नाने प्रतिआळंदी उभारली जाणार आहे. त्यात आता पालिकेच्या माध्यमातून होणारे सुशोभीकरण हे परिसर एक छोटे पर्यटन केंद्र म्हणून उदयास येण्यास मदत होणार आहे.
नदी जलसंर्वधन ही मागणी आहे. यासाठी पालिकेने केलेले प्रयत्न हे सकारात्मक पाऊल आहे. मात्र सुशोभीकरण करण्यापूर्वी नदी पात्रात थेट सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावावा.
- समीर सोहोनी, सदस्य, उल्हास नदी निर्मल जल अभियान.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.