रेल्वेने बसविले दिशाहीन सरकते जिने

रेल्वेने बसविले दिशाहीन सरकते जिने

Published on
रेल्वेने बसविले दिशाहीन सरकते जिने रुग्ण, दिव्यांगांसाठी काही गैरसोयीचे, काही निरुपयोगी कुलदीप घायवट : सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. २६ : उपनगरीय रेल्वे स्थानकांवर अपंग, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, गर्भवतींना प्रवास करणे सोयीस्कर होण्यासाठी रेल्वेवर सरकते जिने बसविण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, यामधील अनेक सरकते जिने दिशाहीन बसविल्याचे समोर आले आहे. काही स्थानकांवर सरकत्या जिन्यांचा वापर करण्याआधी पायऱ्या चढाव्या लागतात. त्यामुळे हे सरकते जिने गैरसोयीचे ठरत आहेत. उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पादचारी पूल उभारण्यास सुरुवात केली. मात्र, हे पादचारी पूल चढण्यात, उतरण्यातच अधिक वेळ जातो. त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडण्याच्या शॉर्टकटलाच प्रवासी प्राधान्य देत होते. तसेच, अपंग प्रवासी, गर्भवती, वृद्ध आणि विद्यार्थी यांना फलाटात असलेले पूल चढताना होणारा त्रास, गर्दीमुळे होणारी ढकला-ढकल यातून सरकत्या जिन्याची संकल्पना पुढे आली. पश्चिम रेल्वेवरील विलेपार्ले येथे पहिला सरकता जिना बसविण्यात आला. मध्य रेल्वेवर ठाणे येथे पहिला जिना बसविण्यात आला. त्यानंतर रेल्वे स्थानकावर सरकते जिने, लिफ्ट बसविण्यास सुरुवात केली. मात्र, हे सरकते जिने प्रवाशांसाठी गैरसोयीचे आणि निरुपयोगी ठरत आहेत. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांना विचारले असता, यासंदर्भात आम्ही लक्ष देऊ, असे त्यांनी सांगितले. --------------- या ठिकाणी गैरसोय १) मध्य रेल्वेवरील परळ स्थानकालगत केईएम, टाटा, वाडिया यांसारखी महत्त्वाची रुग्णालये आहेत. या पार्श्वभूमीवर परळ स्थानकात सीएसएमटी दिशेकडे दोन फलाटांवर बाजूबाजूला सरकते जिने बसविले आहेत. मात्र, त्यांचा वापर प्रवाशांना करता येत नाही. स्थानकात प्रवेश करण्यासाठी रुग्णांना पादचारी पूल चढूनच स्थानकात प्रवेश करावा लागतो. बोटावर मोजण्याइतक्या प्रवाशांकडून सरकत्या जिन्यांचा वापर केला जातो. २) मध्य रेल्वेच्या टिटवाळा, आसनगाव येथील सरकते जिने अपंग, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिलांसाठी गैरसोयीचे आहेत. या सरकत्या जिन्यांवर जाण्यासाठी आधी पायऱ्या चढाव्या लागतात. मात्र, पायाने अधू असलेल्या प्रवाशांना या पायऱ्या चढणे गैरसोयीचे होते. पश्चिम रेल्वेवरील लोअर परळ फलाट क्रमांक एकवरील दादर दिशेकडील सरकता जिना निरुपयोगी झाला आहे. प्रवाशांकडून या सरकत्या जिन्याचा वापर केला जात नसल्याचे चित्र आहे. --- मध्य रेल्वेने सरकते जिने, लिफ्ट बसविण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. हा चांगला उपक्रम आहे. मात्र, टिटवाळासह काही स्थानकांतील सरकते जिने अपंग प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरत आहेत. जर सरकत्या जिन्यांवर पायऱ्या असतील, तर त्यांचा उपयोग काय. मध्य रेल्वेने अपंग डब्यांच्या जवळपास सरकते जिने, लिफ्ट उभारणे आवश्यक आहे. - देवेन तुरे, अपंग प्रवासी, टिटवाळा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()