मुंबई
आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी दीड टक्के रुग्ण ओमिक्रॉन बाधित
मुंबईतील आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी
दीड टक्के रुग्ण ओमिक्रॉनबाधित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत १५ हजारांच्या आसपास प्रवासी दाखल झाले. त्यातील १९४ म्हणजे केवळ दीड टक्के प्रवाशांना ओमिक्रॉनची बाधा झाली आहे. त्यातील १७९ जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले असून केवळ १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १ नोव्हेंबरपासून आजपर्यंत १४,९१८ प्रवासी दाखल झाले. त्यातील १९४ प्रवाशांना ओमिक्रॉन विषाणूची बाधा झाली. त्यात ११९ पुरुष आणि ७५ स्त्रियांचा समावेश आहे. त्यातील ९५ प्रवासी मुंबईबाहेरील आहेत. विमानतळावरील एकूण आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी २३९ जणांना कोविडची बाधा झाली आहे. त्यात १३८ पुरुष व १०१ स्त्रियांचा समावेश आहे. डोमेस्टिक प्रवाशांपैकी १२८ जणांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत सापडलेच्या बाधितांपैकी २१५ मुंबईचे रहिवासी आहेत. त्यात १०९ पुरुष आणि ५५ स्त्रियांचा समावेश असून ५१ जण मुंबईबाहेरील आहेत. बाधितांपैकी एकही रुग्ण गंभीर स्थितीत नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.