अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला विरोध

अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला विरोध

Published on
देशमुख यांच्या जामीन अर्जाला ईडीचा न्यायालयात विरोध मुंबई, ता. ५ : खंडणी वसुलीच्या आरोपात अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला ईडीने बुधवारी (ता. ५) प्रतिज्ञापत्राद्वारे विशेष न्यायालयात विरोध केला. ईडीने देशमुख यांच्या विरोधात निर्धारित वेळेत म्हणजे साठ दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे डिफॉल्ट जामीन मंजूर करण्याची देशमुख यांनी केलेली मागणी बेकायदा आहे, असा दावा ईडीने केला आहे. ईडीने जरी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असले तरी अद्याप त्याची दखल न्यायालयाने घेतलेली नाही. त्यामुळे देशमुख यांना आपसुकच डिफॉल्ट जामीन मंजूर होतो, असे त्यांच्या वतीने ॲड. अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केला. देशमुख यांच्यासह अकरा जणांवर ईडीने आरोपपत्रात दाखल केले आहे. बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझेमार्फत हॉटेल चालकांकडून खंडणी वसूल केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी त्यावर पुढील सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.