मुंबई
एकीकडे करोना, दुसरीकडे ताप, सर्दी-खोकल्याची साथ;
तापासह सर्दी-खोकल्याची साथ
दवाखान्यातील गर्दीत वाढ; वातावरण बदलाचा परिणाम
वाशी, ता. ६ (बातमीदार) : कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असतानाच वातावरण बदलामुळे चार पाच दिवसांपासून सर्दी, खोकला आणि तापाची साथ पसरली आहे. विलगीकरण आणि इतर नियमांचे पालन करावे लागू नये म्हणून अनेक रुग्ण कोरोना चाचणी करण्याचे टाळत आहेत.
घरातच उपचार किंवा खासगी डॉक्टरांचा सल्ला घेतला जात आहेत. त्यामुळे खासगी दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढली आहे. मागील काही दिवसांपासून नवी मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढत असून कोरोना रुग्णांचा आकडा तीन हजारांच्या पार गेला आहे. त्यात वातावरणात बदलामुळे सगळीकडे सर्दी, खोकला आणि तापाची साथ पसरली आहे. सध्याच्या कोरोना संसर्गाची लक्षणेही सारखीच असल्याने अनेक नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
नवी मुंबई छोट्या दवाखान्यांत साथीचे आजार असलेल्या रुग्णांच्या संख्येत जवळपास ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दवाखान्यांत दिवसाला १५० ते २०० रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोना चाचणी केल्यानंतर बाधित आढळल्यास विलगीकरणात राहावे लागेल, त्यामुळे अनेक जण चाचणी करण्यास टाळाटाळ करत असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्यास प्राधान्य देत आहेत. एखाद्या रुग्णास सतत तीन दिवस ताप, सर्दी किंवा अंगदुखी असेल तर त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
वातावरण बदलामुळे ताप, सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यात कोरोना संसर्गाची लक्षणेही अशीच असल्यामुळे एखाद्या रुग्णामध्ये ही लक्षणे सतत तीन दिवस आढळल्यास कोरोना चाचणी करण्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार, पुढील उपचार करण्यात येत आहेत.
- डॉ.मंगेश वास्के, फिजिशियन, नवी मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.