corona
corona Sakal

वसई, विरारमध्ये कोरोना हटाव मोहीम

Published on

वसई : वसई-विरार महापालिकेच्या (vasai-virar municipal corporation) आरोग्य विभागाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव (corona patients) पाहता विविध उपाययोजनांवर भर दिला आहे. कोरोनाबाधित गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र केंद्र उभारण्यात आले आहे, तर वॉर रूम, इस्पितळ, ऑक्सिजन सुविधा (oxygen facility) सज्ज करण्यात आली आहे. महापालिकेने कोरोनाविरोधात लढाईसाठी लक्ष केंद्रित केले आहे. वसई, विरार शहरांची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक असून बैठी घरे, चाळी, इमारती मोठ्या प्रमाणात आहेत. (vasai virar municipal corporation all set to decrease corona patients)

corona
वाशी, ऐरोली, नेरुळ रुग्णालयात बाह्यरुग्णसेवेचा ताण

अशात नागरिकांची गर्दी वाढत असल्याने महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांना गृहविलगीकरणाचा सल्ला दिला जात असून सात दिवस घराबाहेर न निघण्याच्या सूचना व औषधोपचाराची माहिती दिली जाते. कोरोनाबाधितांसाठी वॉर रूमची व्यवस्था करण्यात आली असून चोवीस तास सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच रुग्णालयातील खाटांची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर दिली जात आहे. सध्या महापालिका क्षेत्रात सहा हजार रुग्ण उपचार घेत आहेत.

कोरोनाबाधितांची संख्या पाहता, रुग्णास उपचार घेण्यासाठी आरोग्य विभागाने खबरदारी घेतली आहे. इस्पितळ, ऑक्सिजन व औषधे आदींची व्यवस्था केली असून लक्षणे आढळल्यास त्वरित नागरिकांनी चाचणी करावी, तसेच संसर्ग वाढू नये याकरिता गर्दी करू नये.

- किशोर गवस, उपायुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.