कोविड रुग्णसंख्या उतरणीला

कोविड रुग्णसंख्या उतरणीला

Published on
कोविड रुग्णसंख्या उतरणीला गंभीर रुग्णांचा आकडाही नियंत्रणात सकाळ वृत्तसेवा नवी मुंबई, ता. १२ : आठवडाभर राज्यासह नवी मुंबईत वाढलेल्या कोविड रुग्णांची संख्या अखेर उतरणीला लागली आहे. १६ हजार उपचाराधीन रुग्णांपैकी ११८ रुग्ण गंभीर आहेत. या रुग्णांमध्येही व्हेन्टीलेटरवर असणाऱ्यांची संख्या कमी असल्याने कोविडची तिसरी लाट जीवघेणी नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. नवी मुंबई शहरात रोजच्या रोज कोविडबाधित रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. परंतु गेल्या दोन दिवसांत ही आकडेवाढ आता काहीशी स्थिर झाल्याचे दिसून येत आहे. १० जानेवारीला १९२४ आणि ११ जानेवारीला १८७३ रुग्ण इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. याआधी सलग दोन दिवस नवी मुंबईत अडीच हजार रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातुलनेत दोन दिवसांतील रुग्णवाढ स्थिर झाल्यामुळे आरोग्य विभागातर्फे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांतील कल पाहता लवकरच रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सद्या बाधित होणाऱ्या रुग्णांमध्ये लक्षणे नसणारे आणि सौम्य लक्षणे असणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. तीव्र लक्षणे असणाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे त्यांचे पर्यवसन गंभीर रुग्णांमध्ये होण्याचे प्रमाण आता नसल्यासारखे झाले आहे. डिसेंबर २०२१ च्या अखेरच्या आठवड्यापासून शहरात कोविडच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली. रुग्णवाढीचा जोर आजही कायम असला तरी गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. तसेच शहरातील ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेन्टीलेटरवर असणाऱ्या रुग्णांची संख्याही नियंत्रणात असल्याने त्याचा महापालिकेच्या कामावर ताण निर्माण झालेला नाही. -------------------------------------- ११ जानेवारीपर्यंतची आकडेवारीचा आलेख उपचाराधीन रुग्ण संख्या - १६५७८ गृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांची संख्या - १०२६७ अतिदक्षता विभागातील रुग्ण संख्या - ११८ व्हेन्टीलेटरवरील रुग्ण संख्या - ११ ऑक्सिजनवरील रुग्ण संख्या - ५७ ------------------------------------- गेले काही दिवसांपासून रुग्णसंख्येची वाढ आता हळूहळू स्थिर होईल असा अंदाज आहे. रुग्णसंख्येचा हाच कल राहिला तर शहरातील कोविड रुग्णांची वाढ पूर्णपणे नियंत्रणात येईल. हा व्हेरिएन्ट सौम्य असल्यामुळे अत्यवस्थ रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()