बालकांना नवजीवन; खारघरमध्ये ९३५ जणांवर हृदय शस्त्रक्रिया
खारघर ः गेल्या काही वर्षांत देशभरातील लहान मुलांमध्ये हृदयाशी (Heart disease) संबंधित आजाराचे प्रमाण वाढले आहे. जन्म घेणाऱ्या १०० नवजात शिशूंपैकी (New born baby) एक बालक हृदयविकाराने ग्रासल्याचे दिसून येते. काही वेळा गर्भातील अर्भकावर उपचार करण्याची वेळ येते; तर काहींवर जन्म घेतल्यानंतर लगेचच शस्त्रक्रिया करावी लागते. खारघरमध्ये (Kharghar) सत्यसाई हेल्थ आणि एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने २०१९ मध्ये श्री सत्यसाई संजीवनी रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. दोन वर्षांत जवळपास ९३५ मुलांच्या हृदयावर मोफत शस्त्रक्रिया (Heart surgery free) करून सर्वसामान्य कुटुंबांना आधार दिला आहे. (Around nine hundred and thirty five child free heart surgery done in past two years at kharghar)
यंदा वर्षभरात जन्मापासून ते १८ वर्षे वयोगटातील जवळपास एक हजार मुलांवर मोफत उपचार करण्याचा ट्रस्टचा संकल्प आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या मुलांचे अथवा पालकांकडे आधार कार्ड असणे एवढेच काय ते सक्तीचे करण्यात आले आहे. भिवंडी येथील ममता आणि अनिल सेठी यांच्या बाळाला जन्मतः हृदयविकाराचा आजार होता. ठाण्यातील एका रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी त्यांना अवाच्या सव्वा खर्च सांगण्यात आल्याने ते चिंतेत होते. सेठी यांच्या मित्राने खारघरमधील श्री सत्य साई संजीवन रुग्णालयात मोफत उपचार होत असल्याची माहिती दिली. त्यानंतर ते बाळाला घेऊन आले असता, सर्व तपासण्या करून १४ मे २०२१ रोजी डॉ. रश्मी, डॉ. श्यामदीप, डॉ. मधू आणि डॉ. स्नेहल आदी डॉक्टरांच्या चमूने शस्त्रक्रिया केली.
नवजात बाळाला पुनर्जन्म मिळाल्याने बाळाच्या आई-वडिलांनी त्याचे नाव ‘संजीवनी’ ठेवले आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत केक कापून सोहळा साजरा केला. माता-बाल संगोपनाविषयी प्रशिक्षण वस्तीत चालणाऱ्या अंगणवाड्या, तसेच आरोग्य सेविकांचा संपर्क गर्भवती महिला आणि लहान बालकांशी येतो. ट्रस्ट आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने रुग्णालयात माता-बाल संगोपनाविषयी प्रशिक्षण सुरू केले असून अनेक सेविका प्रशिक्षण घेऊन वस्ती पातळीवर काम करीत आहेत. स्वतंत्र बेबी क्लिनिक श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअर हे जन्मजात हृदयाशी संबंधित आजाराची काळजी घेणारे बाल हृदय उपचार केंद्र आहे. या ठिकाणी शस्त्रक्रिया आणि तपासणी विनामूल्य आहे. तसेच गर्भवतींची नऊ महिने मोफत तपासणी करून औषध दिले जाते.
गोरगरीब कुटुंबांसाठी वरदान रुग्णालयात महाराष्ट्रसह देशातील विविध प्रांतांतील गोरगरीब कुटुंबांतील लहान मुलांच्या हृदयासंबंधीच्या आजारावर मोफत उपचार केले जात असल्यामुळे क्रिकेटपटू सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांच्याकडून सहकार्य केले जाते. गावस्कर आणि तेंडुलकर या दोघांनी खारघर येथील रुग्णालयात जवळपास तीन वेळा भेट देऊन उपचार झालेल्या बालक आणि पालकांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत.
हे रुग्णालय गरिबांसाठी वरदान ठरते आहे. रुग्णालयात जन्मजात ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांवर उपचार केले जातात. दीड वर्षात ९३५ बालकांच्या हृदयावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून या वर्षात एक हजार बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा रुग्णलयाचा संकल्प आहे. त्यामुळे हृदयासंबंधित आजार असलेल्या बालकांच्या पालकांनी खारघर येथील रुग्णालयात भेट द्यावी. - डॉ. सी. एस. श्रीनिवास, संचालक, सत्य साई संजीवनी रुग्णालय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.