हॉटेल उद्योगाची दुर्दशा थांबवा, ‘आहार’ची राज्य सरकारकडे धाव
मुंबई : उपाहारगृहांवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे हॉटेल उद्योग (Hotel business) उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी सरकारने (Maharashtra government) तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. हॉटेल व्यावसायिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन ‘आहार’ (इंडियन हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन) संस्थेने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेऊन अडचणीत सापडलेल्या उद्योगाला बाहेर काढण्यासाठी हस्तक्षेप करण्याचीही विनंती करण्यात आली आहे. उपाहारगृहे चालवण्याच्या सध्याच्या वेळा अव्यवहार्य आहेत. (letter to cm uddhav Thackeray about hotels business issue due to corona)
उपाहारगृहे आणि बारमधील जेवणाची सेवा सध्या रात्री १० ते १२ वाजेपर्यंत वाढवण्याची विनंती ‘आहार’ने एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे. ग्राहकांसाठी २४ तास अन्नपदार्थ वितरण सेवा उपलब्ध करण्याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वांची मागणीही केली आहे. त्यामुळे अंमलबजावणीदरम्यान छळवणुकीच्या घटना कमी होण्यास मदत होईल. महामारीमुळे बेरोजगार झालेले शेती उत्पादन, कुक्कुटपालन केंद्र, मत्स्यपालन, दुग्धजन्य पदार्थ, वाहतूकदार इत्यादींसारख्या पूरक सेवांतील व्यावसायिकांना मदत होईल, असेही पत्रात म्हटले आहे.
एफएल- ३ परवाना शुल्काची रक्कम सध्याच्या तुलनेत ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्याची गरज आहे. असे झाले तरच नियमित व्यवसायाच्या तोट्याची भरपाई करणे शक्य होईल, असे ‘आहार’ने अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. या प्रक्रियेत वारंवार होत असलेल्या व्यत्ययांमुळे उद्योगाला फटका बसला असल्याचेही पत्रात नमूद केले आहे. आम्ही २०२२-२३ वर्षाकरिता रात्री १२ वाजेपर्यंत जेवणखाणे सेवा वाढवण्यासह एफएल- ३ परवाना शुल्कामध्ये ५० टक्के कपातीची मागणी केली आहे.
अशा सवलतीमुळे सरकारला महसूल निर्मिती करण्यास शिवाय आस्थापना पुन्हा सुरू होण्यास मदत होईल. हॉटेल उद्योगाद्वारे केवळ रोजगार संधीच उपलब्ध केल्या जात नाहीत, तर अन्य संबंधित क्षेत्रांनाही मोठ्या प्रमाणात साहाय्य केले जाते आणि म्हणून सरकारने त्याबाबत सहानुभूतीने विचार करणे काळाची गरज आहे, असे ‘आहार’चे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले. शरद पवार यांनाही साकडे ‘आहार’च्या प्रतिनिधी मंडळाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही भेट घेऊन हॉटेल व्यावसायिकांना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. दोन वर्षांतील अडथळ्यांमुळे हॉटेल उद्योगाला कठीण स्थितीचा सामना करावा लागला. अनेक व्यवसाय बंद झाले, असे ‘आहार’चे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.