BMC : समुद्राचे पाणी गोडे करण्याकडे पाऊल
मुंबई : १० कोटी ६८ लाखांचे शुल्क समुद्राचे पाणी (Sea Water) गोडे करण्याच्या प्रकल्पांसाठी सल्लागार नेमण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने (bmc sthayi samiti) मंजुरी दिली. या सल्लागाराला महापालिका तब्बल १० कोटी ६८ लाख रुपयांचे शुल्क देणार आहे. गोराई येथे समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून पहिल्या टप्प्यात २०० दशलक्ष लिटर पिण्याचे पाणी तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर ही क्षमता दैनंदिन ४०० दशलक्ष लिटरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाचे सूचक असलेले ‘आयडीई’ या कंपनीला पालिकेने प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी दिली आहे. (bmc sthayi samiti gives permission for appointing advisor in sea water project)
त्यानंतर आता या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. स्पेक इंडिया या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय स्थायी समितीत शुक्रवारी (ता. १४) घेण्यात आला. सल्लागार शुल्कापोटी १० कोटी ६८ लाख रुपयांचा खर्च पालिका करणार आहे. पालिकेला २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. प्रकल्प अहवालाची पडताळणी करणे, संकल्पचित्र, आरेखन, निविदा मसुदा, प्रस्तावाची पडताळणी करणे, तसेच प्रत्यक्ष प्रकल्प सुरू झाल्यावर त्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असेल, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. मुंबईतील भविष्यातील पाण्याची गरज लक्षात हा प्रकल्प आखण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रतिलिटर १८ रुपये खर्च धरणातील पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य बनविण्यासाठी प्रत्येक हजार लिटरला १७ रुपयांचा खर्च येतो; तर समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पातून एक हजार लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी १८ रुपयांचा खर्च येणार आहे. या प्रकल्पासाठी पालिकेने सागरी आणि भौतिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. ते कामही पूर्ण झाले आहे. तसेच प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.