पालघर: ज्वेलर्स मालकासह पत्नी, मुलाविरोधात फसवणुकीचा गुन्हा
मनोर : बोईसर शहरातील तारापूर रस्त्यावरील एका इमारतीमधील अनधिकृत मजल्यावरील सदनिका बनावट कागदपत्रांच्या (Fake documents) आधारे विक्री केल्याप्रकरणी पालघर (Palghar) शहरातील प्रसिद्ध नॅशनल ज्वेलर्सचे मालक सागरमल जैन यांच्या पत्नी आणि मुलाविरोधात बोईसर पोलिस ठाण्यात (Boisar police station) गुन्हा दाखल झाला आहे. चिंचणी येथील रहिवासी केतन राऊत यांची बोईसर शहरातील सागरमल जैन यांच्याशी ओळख झाली होती. सागरमल यांच्या पत्नीच्या नावाने शहरातील रूपराजत सोसायटीमध्ये सदनिका होती. राऊत यांनी ही सदनिका १४ लाख २८ हजार रुपयांना खरेदी करण्याचा निर्णय २०१८ मध्ये घेतला.
या व्यवहारापैकी १ लाख २८ हजारांचा आगाऊ धनादेश, तर उर्वरित १२ लाख ९० हजार रुपये गृहकर्जाच्या माध्यमातून दिले होते. बँकेचे व्याज दर अधिक असल्याने राऊत यांनी कमी व्याज दर असलेल्या दुसऱ्या बँकेत आपले गृह कर्ज खाते स्थानांतरित करण्यासाठी अर्ज केला होता. बँकेने त्यांच्याकडे इमारतीच्या कागदपत्रांची मागणी केली असता, राऊत यांनी सागरमल जैन यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली; परंतु ही कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
यामुळे राऊत यांनी पालघरच्या नगररचना कार्यालयातून इमारतीचा आराखडा व मंजूर नकाशाची नक्कल प्रति काढून घेतल्या असता मंजूर नकाशानुसार इमारतीचे बांधकाम न करता संपूर्ण इमारतच अनधिकृत असल्याचे राऊत यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राऊत यांनी बोईसर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्यानुसार सागरमल जैन, त्यांची पत्नी लाडलीदेवी जैन आणि मुलगा विपुल जैन यांच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.