contaminated water
contaminated watersakal media

खारघरमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Published on

खारघर : खारघर (Kharghar) सेक्टर १२ मधील काही सोसायट्यांमध्ये चार दिवसांपासून दुर्गंधीयुक्त दूषित पाणी (contaminated water) येत आहे. यामुळे नागरिक आजारी पडण्याची शक्यता बळावली आहे. सिडकोने (cidco) वेळीच जलवाहिनीची पाहणी करून दोष दूर करावा, अशा मागणीचे पत्र नगरसेवक रामजी बेरा यांनी सिडकोच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिले. या वेळी अशुद्ध पाण्याची बाटलीही अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली. खारघर सेक्टर १२जी टाइप प्लॉट नं १३५, १३६, १३७ मधील स्मितल, नूतन आणि निशिगंधा सोसायटीमध्ये आठ दिवसांपासून, तर सोसायटीसमोरील रो हाऊसेसमध्ये दोन दिवसांपासून दुर्गंधीयुक्त दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी स्थानिक नगरसेवक रामजी बेरा, दीपक शिंदे यांच्याकडे केली होती. (Contaminated water in navi mumbai kharghar people suffers from health issues)

contaminated water
मुंबईतील हवेचा दर्जा घसरला

बेरा आणि शिंदे यांनी काही सोसायटीत भेट देवून पाहणी केली. त्या वेळी त्यांना दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचे दिसून आले. बेरा यांनी हे दूषित पाणी बाटलीत भरून खारघर कार्यालयातील सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी चेतन देवरे यांना दिली. दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिक आजारी पडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. पाणीपुरवठा होणाऱ्या जलवाहिनीतील तांत्रिक दोष दूर करावेत, असे निवेदन या वेळी देण्यात आले. यावेळी भाजपचे खारघर मंडळ सरचिटणीस दीपक शिंदे, व्यापारी असोसिएशनचे अंबालाल पटेल उपस्थित होते.

सिडकोच्या पाणीपुरवठा विभागात विचारणा केली असता, या सोसायट्यांतील जलवाहिनीची पाहणी केली जात आहे. तातडीने समस्या दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. कोट - ज्या सोसायटीत दूषित पाणीपुरवठा होत आहे. अशा सोसायटीत तात्पुरत्या स्वरूपात टँकरने पाणीपुरवठा केला जाईल असे आश्वासन सिडको अधिकाऱ्यांनी दिले आहे. - रामजी बेरा, नगरसेवक खारघर सेक्टर १२ मध्ये वर्षभरापूर्वी दूषित पाणीपुरवठा झाल्यामुळे नागरिकांना उलटी, जुलाब या समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे नागरिकांनी नियमिपणे पाणी उकळून प्यावे, असे आवाहन केले आहे. - दीपक शिंदे, सरचिटणीस, भाजप, खारघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.