मुंबई
१२०० जणांवर मोनोक्लोनल अँटीबॉडी उपचार
१२०० जणांवर मोनोक्लोनल प्रतिपिंड उपचार
वेगवान पद्धतीने बरे होण्याच्या प्रमाणात वाढ
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : पालिकेच्या सेव्हन हिल रुग्णालयात दुसऱ्या लाटेत मे महिन्यात ‘मोनोक्लोनल अँटीबॉडी’ उपचार पद्धतीस सुरुवात झाली. याअंतर्गत आजवर १२०० ते १३०० रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आल्याचे सेव्हन हिल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितले.
भारतीय औषध नियामक प्राधिकरणाने घालून दिलेल्या नियमांनुसार या उपचार पद्धतीचा वापर केला जातो. मोनोक्लोनल अँन्टीबॉडी हे नैसर्गिक प्रतिपिंडेच आहेत. शरीरातील विषाणू वा जिवाणूंविरोधात ही उपचार पद्धती कार्य करीत असते. नैसर्गिक प्रतिपिंड उपचार पद्धतीनंतर रुग्णाला किमान दोन तास निरीक्षणाखाली ठेवले जाते. या उपचार पद्धतीत बरे होण्याचा दर अधिक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
...
अतिजोखमीचे रुग्ण
ही प्रतिपिंडे प्रयोगशाळेत निर्माण केली आहेत. विशिष्ट रोगाला लक्ष्य करण्याच्या हेतूने त्याची रचना असते. भारतीय औषध नियामक प्राधिकारणाने कॅसिविरीमॅब आणि इमंडेव्हीमॅब या मिश्र उपचार पद्धतीला आपत्कालीन मान्यता दिली. या पद्धतीच्या उपचारात वयोवृद्ध आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, फुफ्फुसाचा आजार यासारख्या उच्च जोखीम घटक असलेल्या रुग्णांचा समावेश करण्यात आला आहे.
...
नियमांची कठोर अंमलबजावणी
४० वर्षांवरील रुग्णांवर याचा उपचार केला जातो. तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असलेल्या रुग्णांवर ही थेरपी वापरतात. तसेच ज्यांचा सिटीस्कॅन स्कोअर ११ हून कमी तसेच ज्या रुग्णांमध्ये सौम्य ते मध्यम संसर्ग आहे, ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज नाही, अशांवर देखील याचा वापर केला जातो. दरम्यान, आयसीयू वा ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांवर मोनोक्लोनल थेरपीचा उपचार केला जात नसल्याचे डॉ. अडसूळ यांनी स्पष्ट केले.
...
मोनोक्लोनल अँटीबॉडी या थेरपीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. आतापर्यंत मुंबईतील जवळपास ८०० हून अधिक रुग्णांना ही थेरपी देण्यात आली आहे. हे औषध आपल्याकडे मोफत दिले जात आहे. पण ज्यांना गरज त्यांच्यावरच ही थेरपी वापरली जाते. पालिकेने मोनोक्लोनल अँटीबॉडीजसाठी पाच हजारांचे टेंडर काढले होते, गरजेनुसार त्याची खरेदी केली जाते.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.