Raigad
Raigadsakal media

रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा कायापालट होणार; विकासासाठी ४० कोटींचा निधी

शिलालेख परिसर, झुलत्या पुलाचा परिसराचे रूपडे बदलणार
Published on

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील प्रमुख स्थळांचा पर्यटन विभागाच्या (Raigad tourism) प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून विकास होणार आहे. यासाठी सुमारे ४० कोटी रुपयांपेक्षा अधिक (forty crore fund) निधीची तरतूद केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी पायाभूत सुविध (Basic facility) देण्यात येणार आहेत. पर्यटनवृद्ध व्हावी, स्थानिकांना रोजगार (employment) निर्मितीला अधिक वाव मिळावा यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत अंदाजपत्रकी रकमेच्या २० टक्के निधी  २०२१-२२ म्हणजेच येत्या तीन महिन्यांसाठी देण्यात येणार आहे.

Raigad
नवी मुंबईतील शाळा पुन्हा गजबजल्या; विद्यार्थ्‍यांची उत्‍स्‍फूर्त हजेरी

या योजनेनुसार कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथील अहिल्यादेवी होळकर तलाव परिसरातील रस्ते, किहिम येथे डॉ. सलीम अली पक्षी अभ्यास व संशोधन केंद्र, कान्होजी आंग्रे समाधी परिसर सुशोभीकरण करणे, आक्षी येथील शिलालेख परिसराचे सौंदर्यीकरण, जिल्हा पोलिस परेड मैदानात पोलिस मित्र शिल्प उभारणे ही कामे लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.

पोलादपूर तालुक्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ आणि परिसराचे सुशोभीकरण, साखर येथील सूर्याजी मालुसरे यांचे समाधीस्थळ व परिसराचे सुशोभीकरण, घागरकोंड येथील झुलत्या पुलाचे बांधकाम तसेच महाड तालुक्यातील शिवथरघळ येथील मंदिराच्या बाजूस संरक्षक भिंत उभारणे या कामांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे. श्रीवर्धन, तळा, खालापूर आणि माणगाव तालुक्यांतील अन्य काही प्रमुख स्थळांसाठीही निधीची तरतूद आहे. या विकास कामांसाठी पालकमंत्री अदिती तटकरे आग्रही आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.