murder
murdersakal media

भिवंडीत अनैतिक संबंधांतून खून; तिघांना पोलीस कोठडी

डॉक्टरच्या प्रीस्क्रिप्शनआधारे हत्येचा उलगडा
Published on

भिवंडी : प्रेमसंबंधात आड येतो याचा राग मनात धरून तिघा सहकाऱ्यांनी एकाची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी ४८ तासांत फक्त डॉक्टरच्या प्रीस्किप्शनच्या (Doctor prescription) आधारे मृतदेहाची ओळख पटवत तिघा आरोपींना अटक (three culprit arrested) केली. ही हत्या अनैतिक संबंधांतून झाल्याचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी सांगितले. २० जानेवारीला कांबे गाव भागातील जुनांदुर्खी रस्त्यावरील पुलाखाली रक्ताने माखलेल्या गोणीमध्ये मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात (Nijampura police station) हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

murder
डोंबिवली: गंभीर गुन्ह्यातील आरोपींची करायचा सुटका; वकीलासह पाच जणांना अटक

या वेळी मृतदेहाच्या शर्टच्या खिशात अर्धवट फाटलेल्या अवस्थेत डॉक्टरच्या प्रीस्किप्शनचा कागद आढळून आला. त्याआधारे पोलिसांनी औषध दुकानदाराला गाठून मृताचा शोध सुरू केला. त्याचदरम्यान एक महिला आपल्या पतीचा शोध घेत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी त्या महिलेला बोलावून मृतदेहाची ओळख पटवली असता तो मृतदेह अरमान शेर अली शाह (वय ४५, राह. आमपाडा) यांचा असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी हत्येच्या कारणाचा तपास सुरू केला. अरमान याला पत्नीचे ती काम करत असलेल्या ठिकाणच्या मो. सलमान अब्दुल मुकीद शेख (वय २७, राह. पिरानी पाडा) या सहकाऱ्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.

अरमान याने पत्नीच्या कामाच्या ठिकाणी जात तेथील मालकास सांगत सलमानला जाब विचारला. या गोष्टीचा राग मनात ठेवून त्याने आपले सहकारी तस्लिमा हलीम अन्सारी (वय ३०) व चांदबाबू ऊर्फ बिलाल सईद अन्सारी (वय २६) यांच्या मदतीने अरमानला फसवून एकाकी स्थळी नेले. त्या ठिकाणी त्याच्या डोक्यात लोखंडी दांड्याने हल्ला करून हत्या केली होती. चौकट २८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता २८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. एसीपी सुनील वडके, प्रशांत ढोले यांनी निजामपुरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार, गुन्हे पोलिस निरीक्षक दीप बने, सपोनि जमीर शेख यांच्या विशेष पोलिस पथकाने या हत्येचा उलगडा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.