Ramdas Athawale
Ramdas AthawaleSakal media

सुपरमार्केटमधील मद्यविक्री समाज विघातक; आठवले यांची सरकारवर कडाडून टीका

Published on

मुंबई : किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये (super market) मद्यविक्री (wine selling) करण्याचा महाविकास आघाडी (Maharashtra Government) सरकारचा निर्णय अत्यंत निषेधार्ह आहे. हा निर्णय समाजविघातक असून त्याचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करीत आहोत, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले. तसेच हा निर्णय रद्द करावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Ramdas Athawale
शव विच्छेदन ऐवजी शवचिकित्सा शब्दप्रयोग हवा; शिवसेना नगरसेवकाची महापौरांकडे मागणी

किराणा मालाचे दुकान आणि सुपर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात महिला, विद्यार्थी लहान मुले जात असतात. गृहपयोगी वस्तू घेत असतात. अशा दुकानांमध्ये जर मद्यविक्री सुरू झाली तर तो राज्य सरकारचा निर्णय समाजासाठी घातक निर्णय ठरेल. त्यामुळे व्यापारी वर्गाने त्यांच्या किराणा दुकानात मद्यविक्री करू नये, असे आवाहनही त्यांनी रिपब्लिकन पक्षातर्फे केले. तसेच ज्या किराणा माल आणि सुपर मार्केटमध्ये मद्यविक्री होत असेल अशा दुकानातून जनतेने कोणत्याही वस्तू खरेदी करू नयेत.

मद्यविक्री करणाऱ्या किराणामाल दुकान आणि सुपर मार्केटवर जनतेने बहिष्कार टाकावा, असे आवाहन आठवले यांनी केले आहे. किराणामाल आणि सुपर मार्केट दुकानात मद्यविक्री करण्याचा राज्य शासनाचा निर्णय अत्यंत खोडसाळ आहे. हा निर्णय त्वरित रद्द करावा, अन्यथा रिपब्लिकन पक्ष महाविकास आघाडी सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही रामदास आठवले यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.